बाल संगोपन योजना म्हणजे काय ? बाल संगोपन योजना | Bal Sangopan Yojana 2022 |

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

बाल संगोपन योजना Bal Sangopan Yojana 2022 |

       ज्या मुलांना आई किंवा वडील या दोघांपैकी एक पालक नसतील अथवा ज्या मुलांना आई आणि वडील हे दोन्ही नसतील व ते अनाथ असतील तसेच बेघर, निराधार अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त ही मुलांना लाभ मिळू शकतो योजनेचा लाभ ० ते १८ वयोगटातील बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळतो. अनाथ, बेघर, निराधार अशा बालकांना आर्थिक मदत करण्यासाठी या योजनेची सुरुवात २००५ साली महिला व बाल विकास विभागा अंतर्गत झाली आहे. या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. त्यामुळे बालकांना शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज पडणार नाही तसेच आर्थिक समस्याचा ही सामना करावा लागणार नाही या योजनेमुळे बालकाचे भविष्य उज्वल बनण्यास मदत होते.

🔴 तुम्हाला सरपंच होण्याची इच्छा आहे,मग हा लेख नक्की वाचा...

     बाल संगोपन योजना अशी केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे परंतु ही पूर्णतः महाराष्ट्र राज्याच्या निधीतून राबवली जाते जाते. बाल संगोपन योजने अंतर्गत किती रक्कम शासन देते? एका बालकास एका वर्षाला १३,२०० रुपये परीक्षण अनुदान मिळते म्हणजेच एका बालकासाठी अकराशे रुपये प्रति महिना बालसंगोपन योजनेअंतर्गत बाल कल्याण समितीमार्फत परीक्षण अनुदान देण्यात येते. ही रक्कम १८ वर्षापर्यंत संबंधित बालकास देता येते. तसेच स्वयंसेवी संस्थेस 75 रुपये प्रति लाभार्थी दरमहा अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात येते.
         कोविड मुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये बँकेत ठेव योजने अंतर्गत जमा करण्यात येतात.

🔰बाल संगोपन योजनेसाठी कोणत्या  बालकांना लाभ घेता येतो ?

१. अनाथ बालके
२. कुष्ठरोग ग्रस्त बालके
३. एच आय व्ही ग्रस्त बालक
४. कॅन्सर ग्रस्त बालक
५. मतिमंद बालके
६. अपंग बालके
७. शाळेत न जाणारे बालकामगार
८. दत्तक देणे शक्य नसलेली बालके
९. ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत.
१०. बालकांचे दोन्ही पालक दिव्यांग आहेत.
११. पालकांचा पत्ता लागत नसलेली बालके.
१२. एकद्या गुण्या अंतर्गत कारावासात असलेली बालके.

🔰बाल संगोपन योजनेसाठी कोण शिफारस करू शकते ?

१. दवाखाने
२. पोलीस स्टेशन
४. न्यायालय
५. कारागृह
६. कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली संरक्षण करणारे अधिकारी

🔰बाल संगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

१. पालकांचा मृत्यू अहवाल.
२. पालकांचा मृत्यूचा दाखला.
३. पालकांचा रहिवासी दाखला.
४. पालकांचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला.
५. रेशन कार्ड झेरॉक्स.
६. पालकांचे आधार कार्ड.
७. पालकांचे पासपोर्ट फोटो
८. बालकाचे आधार कार्ड.
९. बालकाचा पासपोर्ट फोटो.
१०. संबंधित बालक शाळेत जात असल्यास शाळेचे बोनाफाईड.
११. बालकाचा पालकांसोबत चा ४ बाय ६ साईज फोटो.
१२. या योजनेसाठी बालकल्याण समितीकडे अर्ज करावा लागतो.
१३. राष्ट्रीयकृत बँकेत अथवा पोस्टमध्ये  बचत खात्याची छायाप्रत.

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज कसा करू शकता ?
ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास https://womenchild.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. ऑफलाईन अर्ज करावयाचा असल्यास जिल्हा कार्यालयातील महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याकडून या योजनेचा अर्ज घेऊन अर्ज करावा लागेल.

 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post