पन्हाळा (प्रतिनिधी) :
कोल्हापुर येथे इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सविता शिवलिंग कळंत्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय एकनाथ आंबेडकर सर यांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह, बुके देऊन सन्मानित करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी पुणे विभाग शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आसगावकर सर व माननीय श्री शिक्षण तज्ञ बी.एम. हिर्डीकर सर , प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी माननीय आशा उबाळे मॅडम तसेच इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश नाईकवाडी सर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम राम गणेश गडकरी हॉल कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे व सत्कार मूर्तींचे ढोल ताशाच्या व हलगीने स्वागत करण्यात आले तसेच मॅडमना विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पुरस्कारामुळे पालक विद्यार्थी शिक्षक तसेच वारणा परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
![]() |
कैलास मोटर्स, कोडोली |
Promoted Content :
🔴 सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास चा ठराव कसा आणला जातो?
🔴 तुमचे मतदार यादीत नाव नाही? असे नोंदवा मतदार यादीमध्ये नाव...
🔴 ग्रामसभा न बोलावल्यास सरपंचावर अपात्रतेची कारवाई होते का ?
🔴 बाल संगोपन योजना म्हणजे काय ? बाल संगोपन योजना | Bal Sangopan Yojana 2022 |
🔴 खडतर प्रवासातून जे.के. रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर...
🔴 HOTEL RNEUKA_हॉटेल रेणुका वारणानगर, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर
🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर