निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.

 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा,       जि : कोल्हापूर.

आपल्या दैनंदिन जीवनात थोडासा बदल करण्यासाठी निरनिराळ्या पर्यटन स्थळांना पर्यटक भेट देतच असतात. निसर्गाचे सौंदर्य पाहण्याचा अनुभव काही अनोखाच असतो आणि म्हणूनच खास निसर्ग पर्यटन करणाऱ्या निसर्ग पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य करण्याची आणि निसर्ग अनुभवण्याची सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलो आहोत. 

ANNABELLA  AGRO  TOURISM :

पाहता क्षणी डोळे दिपून जातील अशा निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी एकाच वेळी ३० व्यक्ती राहण्याची सर्व सोयी सुविधांयुक्त उत्कृष्ट पद्धतीने सोय केली जाते. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास ग्रामीण संस्कृतीचा अनोखा पैलू पाहावयास व अनुभवण्यास मिळतो. जसे की, ग्रामीण भाषा, ग्रामीण रूढी परंपरा यांचे जतन व आचरण या ठिकाणी केले जाते. पर्यटकांच्या आवडीनुसार रूचकर आणि चविष्ट घरगुती पद्धतीने बनवलेल्या भोजनाचा आस्वाद घ्यावयास मिळतो. भोजनाची चव घेत असताना वन भोजनाचाही आनंद पर्यटक घेऊ शकतात. 

पर्यटक आपल्या फॅमिली सोबत व आपल्या मिञांसमवेत इथे वास्तव्यास येऊ शकतात. आपल्या करमणुकीच्या साधनांमध्ये वेगवेगळे खेळ पर्यटक खेळू शकतात. तसेच, ह्या ठिकाणी आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी बर्थडे पार्टी, फॅमिली समारंभ साजरे करण्यासाठी प्रशस्त लॉनची व्यवस्था केलेली आहे. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेत असतानाच शेतात राहण्याचा अनुभव देखील पर्यटक इथे घेऊ शकतात. या ठिकाणी वास्तव्य करत असताना फ्री वाय-फायचीही व्यवस्था केलेली आहे. कृषीप्रधान देशात शेती कशा पद्धतीने केली जाते याचा नमुना म्हणून येथे नर्सरीचीही व्यवस्था केलेली आहे. पर्यटकांना एक दिवसीय ट्रीपचा आनंद लुटता येतो. ज्या पर्यटकांना जंगलात जाऊन टेन्ट कॅम्प करण्याची घनघोर इच्छा असते परंतु अनेक नैसर्गिक समस्यांमुळे ती इच्छा पूर्ण करता येत नाही अशा पर्यटकांसाठी टेन्ट कॅम्पिंग ची व्यवस्था Annabella Resort करते. 

एक दिवसीय टेन्ट कॅम्पिंग मध्ये पर्यटकांना पुढील बाबी समाविष्ट करून दिलेल्या आहेत :

  • टेन्ट  मध्ये राहणे 
  • दोन वेळचे जेवण 
  • एक वेळचा नाश्ता
  • बोन फायर 
  • कराओके म्युझिक 
  • ट्रेकिंग
या सोबतच ग्रामीण संस्कृतीचे दृश्य, पक्षी टेहाळणी, गड चढणे इ. गोष्टींचा समावेश टेन्ट कॅम्पिंग मध्ये केला जातो. 

















टेन्ट कॅम्पिंग वेळ : शनिवारी संध्याकाळी ०५:०० ते रविवारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. 

👉 अशा ह्या निसर्गरम्य परिसराला एकवेळ अवश्य भेट द्या ! ! !

             ता - गगनबावडा, जि - कोल्हापूर. 
             मो. नं - ९८६०४२६२६२


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post