वारणानगर (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत "आर्थिक साक्षरता" या विषयावरच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील भारतीय स्टेट बँकेचे विभागीय प्रमुख अधिकारी आणि आर्थिक साक्षरता क्षेत्रातील तज्ञ रविकुमार जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी भूषविले. यावेळी याच क्षेत्रातील वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्री महेश यादव उपस्थित होते. व्याख्यानमालेला शुभेच्छा श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री रविकुमार जगताप यावेळी म्हणाले की, आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या पैशाचे योग्य नियोजन आणि त्याचे ज्ञान आवश्यक आहे. आर्थिक साक्षरता हेही एक कौशल्य असून आपल्याकडे उपलब्ध असणारा पैसा हा मोठा होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात बचत व गुंतवणूक आणि त्यासंबंधीचे ज्ञान आवश्यक आहे. आपल्याकडील येणारे उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालून थोडी जोखीम पत्करून चांगला परतावा प्राप्त करणे म्हणजे आर्थिक साक्षरता आहे. आजही सुशिक्षित लोक खोट्या जाहिराती आणि अमिषाला बळी पडून विविध ठिकाणी गुंतवणूक करतात त्याचा परिणाम मुद्दल आणि व्याजही गायब होते. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना त्याचा पूर्व इतिहास, वर्तमान आर्थिक स्थिती याचा गुंतवणूकदारांनी अभ्यास करावा. शासकीय ध्येय धोरणा नुसार वाटचाल करणाऱ्या योजनांमधूनच गुंतवणूक केल्यास कष्टाचा पैसा सुरक्षित राहील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. आजही देशात फक्त तीनच टक्के लोक आर्थिक साक्षर असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मुदत ठेवीवरील व्याजदर कमी झाले असून मिळणाऱ्या व्याजावरील कर दिल्यानंतर ग्राहकांना तीन टक्के इतके ही लाभ रक्कम शिल्लक राहत नाही. म्हणून गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करून आर्थिक परतावा, खात्रीशीर प्राप्त करावा. आर्थिक साक्षरतेत हुशारी, सावधपणा आणि निर्णय क्षमतेला महत्त्व असल्याचेही ते म्हणाले.
![]() |
कैलास मोटर्स,कोडोली |
श्री महेश यादव यांनी यावेळी सांगितले की, "गुंतवणूकदारांनी हे पक्के लक्षात ठेवावं की गुंतवलेला पैसा हा आपल्याच नावावरती कसा राहील आणि त्याचे वेगवेगळे फायदे आपल्याला आणि आपल्या पश्चात कुटुंबाला कसे मिळतील हे गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्यावे." 🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी या विषयावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न..
अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की," आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून समाजातील सर्वच आर्थिक स्तरातील लोकांच्या मध्ये जागृतीची गरज असून, पैशाचे, ठेवीचे आणि कर्जाचे योग्य नियोजन, त्याचबरोबर ज्ञात अज्ञात उत्पन्नाच्या मार्गातून सक्षम आर्थिक उत्पन्नाबरोबर सरकारला जमा करावयाच्या कराचे ही नियोजन, अर्थात करपात्र उत्पन्नाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आज आर्थिक साक्षरच असून चालणार नाही तर डिजिटल आर्थिक साक्षरता ही काळाची गरज झाली आहे."
प्रारंभी स्वागत प्रास्ताविक डॉ. सी आर जाधव यांनी तर सूत्रसंचालन डॉ. बी.के. वानोळे केले. आभार डॉ. आर. एस. पांडव यांनी मानले.
Promoted Content :
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा....
🔴 तुमचे मतदार यादीत नाव नाही? असे नोंदवा मतदार यादीमध्ये नाव...
🔴 ग्रामसभा न बोलावल्यास सरपंचावर अपात्रतेची कारवाई होते का ?
🔴 खडतर प्रवासातून जे.के. रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर...
🔴 HOTEL RNEUKA_हॉटेल रेणुका वारणानगर, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर
🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर