वादग्रस्त फेरफार रद्द कसा करावा./ How to cancel a controversial modification.

https://www.socialmediaaanibarachkahi.com/search/label/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE?&max-results=5

🔰फेरफार उतारा म्हणजे काय ?

तुमच्या गावातील गाव कामगार तलाठी सातबारा अभिलेखात जे बदल करतात त्याला फेरफार असे म्हणतात सदर फेरफार हा नमुना क्रमांक - ६ मध्ये नोंदवला जातो. फेरफार उताऱ्यास नमुना - ड तसेच नोंदीचा उतारा असे ही म्हणतात. वारस नोंद, खरेदी-विक्री नोंद, तसेच तुम्ही काढलेल्या बँकेतील बोजा नोंद ही नमुना क्रमांक - ६ मध्ये नोंदवली जाते. नमुना क्रमांक - ६ नोंदवही मध्ये वादग्रस्त प्रकरणाची नोंद, फेरफार मध्ये हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार तक्रार संदर्भात तलाठ्यांनी केलेली चौकशी व मंडळ अधिकारी यांनी दिलेला निर्णय, तसेच विलंब शुल्काची नोंद, पोट हिस्सा नोंद, भूसंपादनाची नोंद या नोंदवाहीत असते.

फेरफार मधील मंजूर नोंद किंवा नामंजूर नोंद झालेस त्यामधील बदल करण्याचा अधिकार गाव कामगार तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांना नसतात. कारण फेरफार झाल्यानंतर सदर फेरफार ची नोंद सातबारावर केली जाते त्यामुळे सातबारा वरती झालेली फेरफार नोंद ही मालकी हक्काचा उल्लेख करत असते त्यामुळे सदर ७/१२ वरील फेरफार बद्दल तुम्हाला   करावयाचे झाल्यास प्रांत अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करावे लागते.

तुमच्या ७/१२ वरती गेल्या शंभर वर्षापूर्वी फेरफार नोंद कशी झाली आहे ? ती आपणास सदरचा फेरफार पाहून समजते आणि सातबारावर झालेला बदल कसा झाला आहे याची माहिती मिळते. महसूल विभाग यांनी ही नोंद १ ऑगस्ट २०२१ पासून डिजिटल स्वाक्षरी मार्फत फेरफार उतारा digitalsatbara.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन पाहण्याची व डाऊनलोड करण्याची सुविधा महसूल विभागामार्फत करण्यात आली आहे. 🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land

🔰हक्कसोडपत्र नोंद फेरफार नोंदवही नोंदवताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?

१. तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा

२. तीन महिन्याच्या आतील नमुना नंबर आठ-अ उतारा

३. नोंदणीकृत हक्कसोडपत्राची सत्यप्रत

४. हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचे स्वयंघोषणापत्र

🔰मृत्युपत्राची नोंद फेरफार नोंदवही नोंदवताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?

१. तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा.

२. तीन महिन्याच्या आतील नमुना आठ - अ उतारा

३. मृत्यूचा दाखला

४. मृत्युपत्राची  सत्यप्रत

५. स्वयंघोषणापत्र

६. वारसांच्या वयाचा पुरावा

७. वारसांचा रहिवासी पुरवा

८. वारसांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नावे मृत्युपत्र केले असल्यास वयाचा पुरावा तसेच रहिवासी पुरावा.

🔰वारस हक्क नोंद फेरफार नोंदवही नोंदवताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?

१. तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा

२. तीन महिन्याच्या आतील नमुना आठ - अ उतारा

३. सदर मालमत्ता वडिलोपार्जित होती का स्वकष्टार्जीत होती हा सिद्ध करणारा फेरफार

४. वारसांच्या वयाचा पुरावा

५. वारसांच्या पत्त्याचा पुरावा   

६. स्वयंघोषणापत्र. 

🔰बक्षीस पत्र, खरेदी खत, भाडेपट्टा, गहाण खत नोंद फेरफार नोंदवही नोंदवताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?

१. तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा

२. तीन महिन्याच्या आतील आठ अ उतारा

३  .सदर नोंदणीकृत दत्ताची सत्यप्रत

४. सूची क्रमांक २

५. बक्षीस पत्र,खरेदी पत्र

🔰फेरफार प्रलंबित कधी राहतो ?

आपण ७/१२ हक्कात बदल करण्यासाठी म्हणजे वारसहक्क, खरेदी दस्त, गहाणखत, न्यायाल्याने दिलेले आदेश नोंदवण्यासाठी जी वर्दी आपण तलाठी यांचे कडे देतो त्यावेळी तलाठी सदर वर्दी नमुना ९ मध्ये नोंदवून हक्कदरास नोटीस बजावतात सदर नोटिशीच आपली हरकत असेल आपणास १५ दिवसांचा आवधी देण्यात येतो.त्या वेळी सदर नोटीशीची प्रत गाव चावडी कार्यालयात नोटीस बोर्टवर दिसेल अशा ठिकाणी तलाठी सदर नोटीस लावतात. त्यानंतर हरकत नसलेस वरिष्ठ अधिकारी म्हणजे मंडळ अधिकारी यांचे कडे सदर फेरफार प्रमाणित करण्यासाठी दिला जातो. तलाठी सदर वर्दी नमुना ९ मध्ये नोंदवून जो पर्यंत मंडळ अधिकारी हे सदर फेरफार प्रमाणित करण्यासाठी तो पर्यंत सदरचा फेरफार ७/१२ सदरी फेरफार प्रलंबित म्हणून निदर्शनास येतो.

🔰वादग्रस्त फेरफार बद्दल तलाठी काय कार्यवाही करतात ?

तलाठी यांनी नमुना ९ मध्ये वर्दी नोंदवून हक्कदरास नोटीस बजावून सदर नोटीशीची प्रत गाव चावडी कार्यालयात नोटीस बोर्टवर दिसेल अशा ठिकाणी लावलेवर हरकत आल्यास सदर हरकत नमुना तीन मध्ये नोंदवतील सदर नोंदवही ही वादग्रस्त प्रकरणाची नोंदवही म्हटली जाते. सदर नोंदवही मध्ये खालील प्रमाणे नोंदी ठेवल्या जातात.

१.अनुक्रमांक
२.फेरफारच्या नोंदीतील अनुक्रमांक किंवा अधिकार अभिलेखातील कच्ची प्रत
३. भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक 
४. हरकत मिळाल्याची तारीख 
५. विवाद करणाऱ्या पक्षकाराच्या नावासह विवादाचा तपशील
६. अधिकाऱ्यांचा निर्णय असा तपशील नियम ५(२) व १६ व २५ प्रमाणे वादग्रस्त प्रकरणाची नोंद ठेवली जाते.

🔰फेरफार नोंद रद्द कशी करावी ?
गावकामगार तलाठी यांनी सदर फेरफारची नोंद महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम अभिलेख आणि नोंद वाह्या तयार करणे व सुरक्षित ठेवणे ,नियम १९७१ अन्वेय नियम १० प्रमाणे नमुना ८ नोंद केले वर सदरची नोंद ठळक ठिकाणी तलाठी कार्यालयात लावून संबंधिताना फेरफारची नोटीस पाठवतील. त्यावेळही काही हरकत असेलेस तर ती हरकत महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम अभिलेख आणि नोंद वाह्या तयार करणे व सुरक्षित ठेवणे, नियम १९७१ अन्वेय नियम १० प्रमाणे नमुना ३ मध्ये सदरची नोंदवतील. सदरची तक्रार मंडळ अधिकारी यांचेकडे सदर करण्यास सांगतील त्यानंतर मंडळ अधिकारी तक्रार केस नंबर देवून हरकत घेणाऱ्याचे व ज्या व्यक्तीच्या बाबत हरकत घेण्यात आली आहे त्यांचे तोंडी अथवा लेखी म्हणणे घेवून उचित निर्णय देतील तो निर्णय तुम्हास मान्य नसलेस तुम्ही त्यावेळही मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर आपणास उपविभागीय अधिकारी यांचेकेडे अपील करू शकता अपिल सदर झालेवर उपविभागीय अधिकारी आर टी एस क्रमांक देवून हरकत घेणाऱ्याचे व ज्या व्यक्तीच्या बाबत हरकत घेण्यात आली आहे त्यांचे तोंडी अथवा लेखी म्हणणे घेवून उचित निर्णय देतील तो निर्णय तुम्हास मान्य नसलेस तुम्ही तर तुम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपिल करू शकता. त्यावेळही उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर आपणास अपिल दखल करावे लागेल.सदर अपिल दखल झालेवर तुम्हाला आर टी एस क्रमांक देवून हरकत घेणाऱ्याचे व ज्या व्यक्तीच्या बाबत हरकत घेण्यात आली आहे त्यांचे तोंडी अथवा लेखी म्हणणे घेवून उचित निर्णय देतील तो निर्णय तुम्हास मान्य नसलेस तुम्ही विभागीय आयुक्त यांचेकडे रिव्हिजन अर्ज दखल करू शकता.

PROMOTED CONTENS :    

🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 ग्रामपंचायत चे कार्य कसे चालते.   

🔴 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post