मोबाईल_Mobile मध्ये खरेदी खत, जुने दस्त असे पाहा… | Maharashtra Land Record |

Mobile मध्ये खरेदी खत, जुने दस्त असे पाहा… Maharashtra Land Record

 Mobile मध्ये खरेदी खत, जुने दस्त असे पाहा… | Maharashtra Land Record |

🔰 १९८५ सालापासून चे जुने खरेदीखत ऑनलाईन कसे पहावे ?

सर्वप्रथम mobile मध्ये   Chrome app मध्ये जाऊन mobile ची desktop site करायची आहे त्यांनतर Chrome मध्ये igrmaharashtra.gov.in असे search केलेवर महाराष्ट्र शासनाची नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधिकृत वेबसाईट आपणास समोर ओपन होईल आपण ऑनलाईन सर्विस हा पर्याय निवडायचा आहे त्यामधील पहिल्या ई-सर्च पर्यायावर क्लिक करून विनाशुल्क सेवा या बटनावरती क्लिक करून त्यामधील Free search 1.9 हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आपणांसमोर search flow नावाचे पेज ओपन होईल त्यावरील सूचना आपण वाचून सदर पेज close करायचे आहे. त्यानंतर आपणासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपणास मिळकत निहाय (Document Details), दस्त निहाय (Document Number) असे पर्याय वरच्या पट्टीमध्ये दिसतील.

🔰मिळकत निहाय (Document Details) ची माहिती भरून दस्त कसा शोधायचा ?

सर्वप्रथम आपणा समोर मिळकत निहाय चे पेज ओपन आहे त्यामध्ये खालच्या बाजूस मुंबई,उर्वरित महाराष्ट्र,उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग हे तीन पर्याय दिसतील त्यामधील आपल्याला हवा आहे तो पर्याय निवडावा त्यानंतर सन,जिल्हा,गावाचे नाव,मिळकत क्रमांक, हे रखाने भरावेत. त्यानंतर आपणासमोर सदर रखान्यात Captcha येईल ते व्यवस्थित पाहून भरावयाचा आहे. त्यानंतर Yes या पर्यायावर क्लिक करून नाव टाकून आपण सर्च करू शकता त्यानंतर मिळकत क्रमांक टाकून सर्च करू शकता त्यानंतर दस्ताचा तपशील आपणासमोर येईल सदर दस्त आपणास हवा असल्यास शेवटच्या रकान्यात index२ या पर्यायावर आपण क्लिक करून दस्त Download करू शकतो. 

🔰दस्त निहाय (Document Number) ची माहिती भरून दस्त कसा शोधायचा ?

सर्वप्रथम आपणा समोर दस्त निहाय चे पेज ओपन आहे त्यामध्ये खालच्या बाजूस Regular हा पर्याय निवडून जिल्हा,दुय्यम निबंधक कार्यालय,वर्ष दस्त क्रमांक रखान्यात भरवे त्यानंतर आपणासमोर सदर रखान्यात Captcha येईल ते व्यवस्थित पाहून भरावयाचा आहे.त्यानंतर Search या पर्यावर क्लिक करून आपणास दोस्त हवा आहे त्याचा तपशील आपल्यासमोर येईल सदर दस्त आपणास हवा असल्यास शेवटच्या रकान्यात index२ या पर्यायावर आपण क्लिक करून दस्त Download करू शकतो.

🔰दस्ताच्या तक्रार निवारणासाठी काय करावे ?

१. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरी भागातील तक्रारींसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://grievanceigr.maharashtra.gov.in/

२. उर्वरित महाराष्ट्रासाठी येथे मेल पाठवा : complaint@igrmaharashtra.gov.in

 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post