Header Add

ग्रामसभा न बोलावल्यास सरपंचावर अपात्रतेची कारवाई होते का ?

ग्रामसभा बोलावण्यात कसूर केल्यास ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी निलंबित होऊ शकतात.

आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत ग्रामसभा घेणे सरपंचावर बंधनकारक आहे. याचा अर्थ १ एप्रिल ते ३० मे किंवा त्यापूर्वी ग्रामसभा होणे गरजेचे आहे. आर्थिक वर्षात किमान चार संविधिक ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. यामधील कोणतीही एक सभा न बोलवली तर कसूर केले बदल सरपंच अपात्र ठरू शकतो, किंवा ग्रामपंचायतीचे सचिव म्हणजेच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबित होऊ शकते.

🔰ग्रामसभा घेण्याचे दिवस :

१. पंचायत राज दिनांक २४ एप्रिल ते महाराष्ट्र दिन १ मे

२. कृषी दिन १ जुलै ते लोकसंख्या दिन ११ जुलै

३. क्रांती दिन ९ ऑक्टोंबर ते स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट

४. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोंबर

५. ग्रामस्थ दिन १९ नोव्हेंबर ते जागतिक महिला अन्याय निवारण दिन २६ नोव्हेंबर

६. गणतंत्र दिन २६ जानेवारी

७. महिला दिन ८ मार्च ते नागरिक संरक्षण दिन ९ मार्च.

कैलास मोटर्स कोडोली
कैलास मोटर्स, कोडोली 

ग्रामसभा घेण्यासाठी सरपंच किंवा उपसरपंच यांनी ग्रामसभा बोलवण्यासाठी कसूर केल्यास ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणजेच ग्रामपंचायतीचे सचिव ग्रामसभा बोलतील. ग्रामसभेत सरपंच किंवा उपसरपंच अध्यक्षस्थानी असतील जर दोन्ही पदे अनुपस्थित असतील तर वयाने ज्येष्ठ असणारे ग्रामपंचायत सदस्य अध्यक्षस्थानी बसून ग्रामसभा घेतील. ग्रामसभा घेणे पूर्वी दिनांक, वेळ किमान सात दिवस आधी आणि विशेष ग्रामसभा घेण्यासाठी किमान चार दिवस आधी सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची माहिती म्हणजेच दिनांक, वेळ अथवा विशेष गावसभेची माहिती म्हणजेच दिनांक,वेळ सार्वजनिक ठिकाणी अथवा नोटीस बोर्डवर लावणे आवश्यक आहे, तसेच मोबाईलवर एसएमएस द्वारे ग्रामसभेची माहिती पाठवावी त्यामुळे ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित राहतील.

ग्रामसभेच्या वेळी घेण्यात आलेल्या निर्णयाची नोंद घेणे तसेच त्यावेळी घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकी संदर्भातील उपस्थितीत असणाऱ्या ग्रामस्थांच्या स्वाक्षरी हजरी पुस्तकाची सुरक्षा राखण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांची संयुक्त असते. या नोंदीमध्ये अनधिकृत फेरफार करणे, खोट्या नोंदी करणे, तसेच संदर्भित नोंदीस व अभिलेखास हानी पोहोचवल्यास भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदी अन्वये संदर्भित व्यक्ती खटला भरण्यास पात्र असते.  🔴 तुम्हाला हि सरपंच होण्याची इच्छा आहे,  मग हा लेख नक्की वाचा..

🔰 ग्रामसभा घेतली नाही तर सरपंचांच्यांवर अपात्रतेची  कारवाई होते ?

चार संविधिक ग्रामसभा पैकी एक ग्रामसभा बोलवण्यात कसूर केल्यास अपात्रता स्पष्ट होते. तसेच सदर ग्रामपंचायत मधील सचिव निलंबित सुद्धा होऊ शकतात तसेच सरपंचांना पुरेशा कारणाशिवाय ग्रामसभा चुकवली तर ते अपात्र सुद्धा ठरू शकतात. संदर्भित सरपंचाकडे ग्रामसभा न बोलवण्यास पुरेसे कारण नसलेस त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेणे जिल्हाधिकारी यांचे काम आहे हा निर्णय अंतिम असतो परंतु त्या विरोधात आपण मुंबई हायकोर्टात रिट अर्ज करू शकतो.

 Promoted Content : 

Post a Comment

0 Comments