तुम्हाला सरपंच होण्याची इच्छा आहे,मग हा लेख नक्की वाचा...

ग्रामपंचायत निवडणूक कशी होते.

🔰 राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायत निवडणुकीची कार्यपद्धत कशी करतात ?

१. सर्वप्रथम राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख,निवडणूक अधिकारी ,मतदार यांची नावे निवडणुकीपूर्वी तहसीलदार यांना लेखी नोटिशिने जाहीर करतील.
२. त्यानंतर उमेदवारास अर्ज दाखल करण्याची तारीख दिली जाते.
३. उमेदवाराने अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्या अर्जाची तपासणीची तारीख असते.
४. उमेदवारास अर्ज परत घेण्याची तारीख देण्यात येते.
५.  उमेदवाराची यादी तयार होते व ती यादी जाहीर करतात.
६. उमेदवाराचे चिन्ह निश्चित होते.
७. मतपत्रिकेचा नमुना प्रसिद्ध होतो.
8. मतदान होते.
९. मतदान मोजणी होते.
१०. निवडणुकीचा निकाल जाहीर करतात.
११.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक आहे.

🔰 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराची पात्रता काय असते ?

१. उमेदवाराचे शिक्षण किमान सातवी पास असावे.
२. उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असावे.
३. उमेदवाराचे नाव सदर मतदार यादीत असावे.

🔰 ग्रामपंचायत उमेदवारीसाठी कोणती  कागदपत्रे लागतात ?

१. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर शपथपत्र व  घोषणापत्र उमेदवारांनी देणेत यावे.
२. उमेदवाराच्या घरी शौचालय असल्याचा दाखला.
३. उमेदवाराचे ग्रामपंचायत बेबाकी प्रमाणपत्र.
४. उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र.
५. उमेदवारास इतर वॉर्ड मध्ये उमेदवारी अर्ज भरावयाचा असल्यास,त्या अर्जसोबत त्यांनी मतदार यादी जोडावी.
६. उमेदवाराच्या वयाचा दाखला.
७. उमेदवाराचा निवासी पुरावा.
८. उमेदवाराचे ओळखपत्र.

कैलास मोटर्स, कोडोली 

🔰 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारास  किती खर्च करता येतो ?

ग्रामपंचायत  निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास राज्य निवडणूक आयोगाने ठराविक रक्कम निश्चित करून दिलेली आहे ती खालील प्रमाणे : 

  • ग्रामपंचायत सदस्य ७ - ९ खर्च करण्याची मर्यादा २५,०००₹,ग्रामपंचायत सदस्य ११- १३ खर्च करण्याची मर्यादा ३५,०००₹, ग्रामपंचायत सदस्य १५ - १७ खर्च करण्याची मर्यादा ५०,०००₹ आहे.
  • तर लोकनियुक्त सरपंच यांना ग्रामपंचायतीच्या सदस्या संख्येनुसार ५०,०००₹ ते १,७५०००₹ खर्च करण्याची 
  • निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मर्यादा आहे हा निवडणूक खर्चाचा हिशोब निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे.

🔰 ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या आणि वार्ड संख्या किती असतात ?

  •    ६०० ते १५०० लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य ७ तर वार्ड ३ असतात .१५०१ ते ३००० लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य ९ तर वार्ड ३ असतात.३००१ ते ४५०० लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य ११ तर वार्ड ४ असतात. ४५०१ ते   ६००० लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य १३ तर वार्ड ५ असतात.६००१ ते ७५०० लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य १५ तर वार्ड ५ असतात. ७५०१ पेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य १७ तर वार्ड ६ असतात.

                                                                                   

 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post