जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात ?
🔰जमिनीची शासकिय मोजणी का करतात ?
👉 बिनशेती करणेसाठी.
👉 कमी जास्त पत्रक (क.जा.प) तयार करणेसाठी.
👉 भूसंपदन करणेसाठी.
👉 शेत जमीनीची हद्द कायम करणेसाठी.
👉 न्यायालयाच्या आदेशावरून जमिन वाटप करणेसाठी.
🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land
🔰जमिन मोजणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
• उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे नावे अर्ज.
त्यामध्ये - १. अर्जदाराचे पुर्ण नाव व पत्ता.
२. सदर जमिनीच्या लगत खातेदारांची नावे.
३. सदरचा ७/१२ उतारा सामईक असलेस सह.हिस्सेदार यांच्या संमती.
४. मोजणी नंबरातील ऊस पिका बाबत खुलासा. ह्या चार बाबी न चुकता लिहाव्यात.
• ३ महिन्याच्या आतील ७/१२ उतारा
• मोजणी फी चलन
• समजुतीचा नकाशा
• सदर ७/१२ वरती लोन असलेस त्या बँकेचा ना हरकत दाखला
• टिपण
• फाळणी
• एकत्रिकरण उतारा
• गट नकाशा
• अर्जाच्या उजव्या कोपऱ्यात १० ₹ कोर्ट फी स्टॅम्प चिटकावा.
🔰 शासकीय मोजणीसाठी ऑफ लाइन अर्ज कुठे व कसा करायचा ?
तुमच्या तालुक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख / नगर भूमपन अधिकारी कार्यालयात तुम्हाला शासकीय मोजणीसाठी ऑफ लाइन अर्ज प्राप्त होईल त्या ठिकाणी तुम्ही तो अर्ज भरुन देयचा आहे. शासकीय मोजणीसाठी ऑन लाइन अर्ज कुठे करायचा? bhumiabhilekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला शासकीय मोजणीसाठी ऑन लाइन अर्ज करता येईल.
🔰 तुम्ही जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज केले नंतरची कार्यवाही काय असते ?
🔰जमिन मोजणीसाठी तुमच्याकडून किती फ्री आकारली जाते?
• साधी मोजणी - प्रति हेक्टर १ हजार ₹
• तातडीची मोजणी - प्रति हेक्टर २ हजार ₹
• अतितातडीची मोजणी - प्रति हेक्टर ३ हजार ₹
• अति-अतितातडीची मोजणी - प्रति १२ हजार ₹
🔰तुमच्या जमिनीची शासकीय मोजणी किती दिवसात येते
• साधी मोजणी - १८० दिवस
• तातडीची मोजणी - ९० दिवस
• अतितातडीची मोजणी - ६० दिवस
• अति-अतितातडीची मोजणी - ३० दिवसात
• मोजणी पुर्ण झाले नंतर मोजणी नकाशाची प्रत - १५ दिवस
👉मोजणी संर्दभात प्रथम अपिल कोणाकडे कराल : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख.
हे हि वाचा :
🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land
🔴 जमीन खरेदी करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
🔴 गोष्ट माहिती अधिकाराची_Right To Information
🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card
🔴 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?
🔴 सात-बारा_७/१२ वरती कोणत्या नोंदी असतात ?
🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking