Header Add

सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास चा ठराव कसा आणला जातो?

https://www.socialmediaaanibarachkahi.com
 

🔴 ग्रामसभा न बोलावल्यास सरपंचावर अपात्रतेची कारवाई होते का ? 

ग्रामपंचायत मध्ये निवडून गेलेल्या व कोणत्याही सभेत उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार असणाऱ्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव आणता येतो, त्यासाठी सदस्यांच्या एकूण संख्येत दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव मागणी करावी लागते. ही मागणी नऊ प्रतीत तहसीलदार यांच्याकडे करावी लागते सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात एकाच वेळी अविश्वास ठराव मागणी करावयाचा असल्यास दोन वेगवेगळ्या नोटीसा देणे आवश्यक आहे तर अशी मागणी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदारांना सात दिवसाच्या आत  अविश्वासाच्या प्रस्तावाचा विचार करून पंचायतीच्या कार्यालयात विशेष गाव सभा बोलण्याची तारीख व वेळ देणे बंधनकारक आहे त्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार स्वतः असतील अशा विशेष सभेत ज्याच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आलेला असेल त्याच्याबद्दल मतदान घेतले जाईल त्या मतदानाच्या वेळी ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेत उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल तीन-चतुर्थांश बहुमत मिळणे आवश्यक आहे. जर विश्वासाचा ठराव सहमत करण्यात आला की त्यांनतर अविश्वास प्रस्ताव सहमत करण्यात आला असे तहसीलदार जाहीर करतील. जर सरपंच व उपसरपंच दोघांविरुद्ध प्रस्ताव सहमत करण्यात आला असेल तर वाद-विवाद कोणत्याही असल्यास तो निर्गत होईपर्यंत गटविकास अधिकाऱ्याकडून प्राधिकृत करण्यात आलेल्या विस्ताराधिकाऱ्यांच्याकडे संबंधित ग्रामपंचायतचा कार्यभार सोपवला जाईल त्यावेळी विस्ताराधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहतील.

कैलास मोटर्स, कोडोली

🔰 सरपंच आणि उपसरपंच यांनी अविश्वासाच्या ठराव बाबत कुठे अपील करावे ?

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणेनंतर कलम ३५ मधील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांना त्याच दिवशी पद सोडावे लागेल. विश्वासाच्या ठरावांमध्ये कायदेशीरपणाबद्दल काही तक्रार असल्यास सात दिवसाचे आत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. या अपीलावर जिल्हाधिकारी यांनी दिवसाच्या आत निर्णय घेणे बंधनकारक आहे हा निर्णय अंतिम असेल या विरोधात आयुक्तांच्याकडे अपील करता येणार नाही. 

 Promoted Content : 

Post a Comment

0 Comments