तुमचे मतदार यादीत नाव नाही? असे नोंदवा मतदार यादीमध्ये नाव...

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी Chrome मध्ये जावून www.nvsp.in असे टाईप करायचे आहे त्यांनतर अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. सर्वप्रथम आपणास login/register या पर्यायावर क्लिक करून  Don't have account. Register as a new user या पर्यायावर क्लिक करून माहिती भरावी लागेल.त्यानंतर आपणा समोर एक नवीन पेज ओपन होईल.त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर captcha टाकायचा आहे. Send OTP या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला  OTP Enter OTP  टाकून Verify वर क्लिक करावे. 🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

नंतर I have EPIC Number आणि  I don't have EPIC Number. हे दोन पर्याय आपल्यासमोर दिसतील.

सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर captcha टाकायचा आहे.  Send OTP या पर्यायावर क्लिक करून मोबाईलवर येणारा  OTP टाकून  Verify या पर्यायावर क्लिक करून. I have EPIC Number आणि  I don't have EPIC Number. हे दोन पर्याय आपणास दिसतील त्यातील I don't have EPIC Number या पर्यायावर क्लिक करून नाव, आडनाव, ई-मेल आयडी, पासवर्ड टाकायचा आहे. पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा आहे माहिती देत असताना  चुका होणार नाही याची काळजी घेयची आहे.

त्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करून. Login करायचं आहे. Registration करताना टाकलेला मोबईल नंबर, password आणि captcha टाकून Login या पर्यायावर क्लिक करून fresh inclusion/ enrolment या पर्यायावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर Citizenship मध्ये I reside in India या पर्यायावर टिक करायचं आहे त्यांनतर मग राज्य निवडायचं आहे. त्यानंतर Next या पर्यायावर क्लिक करून आपल्या मतदारसंघाची  माहिती भरायची आहे. सर्वप्रथम लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे. त्यानंतर आपला पोस्टाचा पत्ता टाकायचा आहे.त्यामध्ये आपणास राज्य, जिल्हा, घर क्रमांक, गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, पिन कोड ही माहिती व्यवस्थितरीत्या भरून झाल्यावर त्या खाली असणाऱ्या Date या पर्याया समोर आपणास तारीख निवडून आपण दिलेल्या पत्त्यावर  किती वर्षांपासून राहत आहात, ती तारीख, महिना आणि वर्ष आपणास सांगावे लागेल त्यानंतर  address proof जोडून next या पर्यायावर क्लिक करून जन्मतारीख, गावाचं नाव, राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर वयाचा पुरावा देयचा आहे.त्यांनतर आपणा समोर Age declaration form हा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून हा form डाऊनलोड करून भरायचा आहे. 🔴 Online Earning Sources

तो form Age declaration या पर्याया समोर अपलोड करून next या पर्यायावर क्लिक करून नाव, आडनाव, लिंग,  वडील, आई , पती विषयी भरून नंतर आपणास फोटो अपलोड करावा लागेल दुसऱ्या एखाद्या मतदारसंघात नाव समाविष्ट करण्यासाठी मी अर्ज केलेला नाही declaration देवून next या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर  preview या पर्याया अंतर्गत नवीन मतदान कार्डासाठी आपण आता भरलेला फॉर्म - ६ आपणासमोर दिसेल त्याखालील submit या बटनावर क्लिक करून आपला फॉर्म submit केला जाईल.  आणि आपणास एक reference ID आयडी दिला जाईल. या reference ID व्दारे आपण form Status चेक करू शकता.


 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post