बांधकाम परवाना कुठे काढावा | construction permission License


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५२ मधील तरतुदीनुसार,ग्रामपंचायत श्रेत्रात बांधकाम करत असताना सदर बांधकामाचा बांधकाम परवाना देण्याचा अधिकार ग्रापंचायत यांना आहे.

२. ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम परवाना घेणेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

१.ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्या नावे विहीत नमुन्यातील अर्ज.

२.सदर जागेच्या मालकीची कागदपत्रे.

३.मंजूर ले आऊट. (दोन प्रतीत)

४.बिल्डिंग प्लान. (दोन प्रतीत)

५.विकास शुल्क व कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरलेली पावती.

६.आर्किटेचरचा विहित नमुन्यातील दाखला.

➦ गावकामगार तलाठी यांचे अधिकार व कर्तव्ये. / Gavkamgar talathi

३. ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला कोठे मिळतो?

बांधकाम धारकाने ग्रामपंचायत कडे पूर्णत्वाचा दाखला मिळणे कमी अर्ज केले नंतर नगर रचना कार्यालयाचे निरिक्षणा अंती ग्रामपंचायत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देते.

४.  गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम करताना बांधकाम परवाना कोण देते ?

     वर्ग १ चे गावकरिता उपविभागीय अधिकारी व वर्ग २ चे गावकरिता तहसीलदार

५.  गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम मंजुरी करिता आवश्यक असणारी कागदपत्रे -

१. बिनशेती आदेश / बिगरशेती आदेश

२. बांधकाम करावयाचे जागेचे मालकीचे कागदपत्र

३. मंजूर ले आऊट

४. विकास प्लान / नकाशा प्रत

५. विकास शुल्क व कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याची पोच/पावती

६. आर्किटेकचा विहित नमुन्यातील दाखला

७. ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र

८. उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचे नावे विहित नमुन्यातील अर्ज 


६.  गावठाण क्षेत्राबाहेर बांधकामास मान्यता कोणाकडून मिळते ?

तहसीलदार / उपविभागीय अधिकारी हे विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झालेनंतर सदरचा प्रस्ताव नगर रचना कार्यालयाकडे पाठवतील नगर रचना कार्यालयाचे निरिक्षणा अंती संबंधित महसूल अधिकारी बांधकाम परवानगी देतील. 


७.  गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कोठे मिळतो?

तहसीलदार / उपविभागीय अधिकारी नगर रचना कार्यालयाचे निरीक्षण अंती महसूल अधिकारी यांचेकडून बांधकाम पूर्णत्वाचा देणेत येतो.


  हे हि वाचा :            

➦ शेत जमीनीचे वाटणीपत्र कसे करावे ? shet jamin vatani patra

➦ गावकामगार तलाठी यांचे अधिकार व कर्तव्ये. / Gavkamgar talathi

➦ डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

➦ ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या कर व फी बदल कुठे तक्रार करू शकतात. / Gram Panchayat taxes and fees complaint

  जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात  

 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post