_1.jpeg)
वारणानगर / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये करिअर गायडन्स, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या वतीने व पुणे येथील ट्रु स्किल इन्फोटेक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना करिअर गाइडन्स व भविष्यातील नोकरीच्या संधी या विषयावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या वेळी दोन्ही संस्थांच्या मध्ये सामंजस्य करार ही झाला. या कार्यशाळेसाठी २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे- सावकर व प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. सौ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे स्वागत व प्रस्ताविक ट्रेनिंग व प्लेसमेंटचे समन्वयक श्री सत्यनारायण आरडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ट्रु स्किल इन्फोटेकचे संचालक श्री.गणेश भुजबळ व प्लेसमेंट हेड ओमकार कोटूळकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते श्री. गणेश भुजबळ यांनी ट्रु स्किल इन्फोटेकचे कार्य कार्य विद्यार्थ्यांच्यात कौशल्यावर आधारित शिक्षण देणारी संस्था असलेल्या सांगून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांच्याकडे पदवी शिक्षणा बरोबर जागतिक दर्जा चे ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्ष व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सध्या अडचणी काय त्या विचारून त्यांना बोलते केले.🔴इटली च्या अभ्यासकांची वारणेला भेट...
पुणे- मुंबई मध्ये संस्था विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे स्किल ओरिएंटेड कोर्सेस देऊन वेगवेगळ्या कंपनीमध्ये प्लेसमेंटच्या संधीही उपलब्ध करून देते. दुसरे प्रमुख वक्ते श्री. ओंकार कोटुळकर यांनी कमी कालावधीत छोटे कोर्स करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नोकरी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अगदी प्रवेश प्रक्रिया कशी आहे, प्रवेश अर्ज कसा भरायचा, इ. विषयी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, येत्या तीन वर्षात एक हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्य व व्यवसायावर आधारित शिक्षण घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल शिकावीत, आत्मसात करावीत. आजच्या जगात नोकरी मिळविण्यासाठी उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. कम्युनिकेशन स्किल, कॉर्पोरेट एटिकेट्स, कम्प्युटर्स स्किल इ. शिकण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावेत असे आव्हान केले.
या कार्यशाळेसाठी ट्रु स्किल इन्फोटेकचे संचालक गौरव काळे व प्लेसमेंट असोसिएट सागर मोरे तसेच नॅक चे समन्वयक डॉ. सुधाकर खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आभार प्रा. रोहित बसनाईक यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. भीमराव वानोळे, प्रा. प्रवीण सातवेकर यांनी सहकार्य केले.
Promoted Content :
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा....
🔴 इटली च्या अभ्यासकांची वारणेला भेट...
🔴 प्राणी आणि निसर्गाकडे जगा आणि जगू द्या या साध्या सरळ तत्वाचा अवलंब करावा : प्रा. साळोखे.
🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?
🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.