‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडीक्षेत्रात कसे करावे ?


‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडी क्षेत्रात कसे करावे ?

Bullet Points 

• ‘पोट-खराब’ वर्ग अ क्षेत्रात कोणते क्षेत्र येते ?
• ‘पोट-खराब’ वर्ग ब क्षेत्रात कोणते क्षेत्र येते ?
• कायम पड जमिन म्हणजे काय ?
• ‘पोट-खराबा’ क्षेत्र कसे ठरवले जाते ?
• ‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडी क्षेत्रात रुपांतरीत केलेचा फायदा काय ?
• ‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडी क्षेत्रात कसे करावे ?
👉 ‘पोट-खराब’ वर्ग अ क्षेत्रात कोणते क्षेत्र येते ?
१.लागवडीस अयोग्य क्षेत्र
२.डोगराळ क्षेत्र
३.खोदकाम करणेत आलेले क्षेत्र
👉 ‘पोट-खराब’ वर्ग ब क्षेत्रात कोणते क्षेत्र येते ?
१.तलाव
२.कॅनॉल
३.सार्वजनिक रस्ते
👉 कायम पड जमिन म्हणजे काय ?
पोट-खराब क्षेत्रापेक्षा पिक घेत नसलेले क्षेत्र जास्त असेल तर सदर क्षेत्रास कायम पड जमिन असे म्हणतात.
👉 ‘पोट-खराब क्षेत्र कसे ठरवले  जाते ?
जे क्षेत्र पिक घेण्यासाठी योग्य नाही त्यास पोट-खराबा क्षेत्र म्हणुन ठरवले जाते.
👉 ‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडी क्षेत्रात रुपांतरीत केलेचा फायदा काय ?
१.सदर क्षेत्रा वरती शेतकरी कर्ज घेऊ शकतो.
२.सदर क्षेत्रा वरती शेतकरी विमा घेऊ शकतो.
३.नैसर्गिक आपत्ती आलेस सदर क्षेत्राचा मोबदला शेतकरी घेऊ शकतो.
४.सदर क्षेत्राची शेतकरी विक्री करू शकतो.

👉 ‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडी क्षेत्रात कसे करावे ?

त्यासाठी तुम्हाला सदर क्षेत्र ज्या गाव कामगार तलाठी यांचेकडे येते त्यांना विनंती अर्ज करायचा आहे.त्या नंतर गाव कामगार तलाठी पंचासह सदर क्षेत्राची पाहणी करुन त्या क्षेत्राचा नकाशा तयार करतील त्यामध्ये सदरचे ‘पोट-खराब’ क्षेत्र दाखवून त्या संदर्भाने पंचनामा तयार करतील सदर पोट-खराब संचिका मंडळ अधिकारी यांना सादर करतील मंडळ अधिकारी यांचा अभिप्राय नोंदवून पुढे तहसीलदार यांना सविनय सादर करतील त्या नंतर तहसीलदार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडून जमिन रूपांतरित कारणेसाठी  अभिप्राय घेऊन  मंडळ अधिकारी यांचे कडून ‘पोट-खराब’ क्षेत्राची विभागणी करणे गरजेचे आहे का ते पाहणी करुन घेऊन मोजणी करावयास लागत असलेस तासा निर्णय देवून सदर पोट-खराब संचिका उपविभागीय अधिकारी यांचेकडे अंतिम आदेश देणेसाठी सविनय सादर करतील सदर पोट-खराब क्षेत्राचा महसूल भरुन घेऊन पोट-खराब क्षेत्रात लागवड करणेस मान्यता देतील.

        हे हि वाचा :                   

🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land  

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान. solar panel

 🔴 जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात  

🔴 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post