🔰 माहिती अधिकारात माहिती मिळवण्यासाठी किती शुल्क भरावे लागते ?
पहिल्या तासाला अभिलेखाचे निरीक्षण करण्यासाठी शुल्क नसते परंतु त्यानंतरच्या प्रत्येक तासाला पाच रुपये आणि माहितीपूर्ण च्या टपाला चा खर्च अंतर्भाव असेल त्यापेक्षा ५० रुपये अधिक घेण्यात येईल.
A4 साईज पृष्टासाठी च्या छायाप्रती किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या पृष्टा साठी दोन रुपये प्रति पृष्ट घेण्यात येईल प्रकाशित पुस्तकाची प्रत मागणी केली असल्यास त्याची ठरलेली रक्कम अथवा प्रति पृष्ठ दोन रुपये घेण्यात येईल. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पुष्टा च्या छायाप्रती साठी नमुना प्रतिमाने यांच्या साठी प्रत्यक्ष खर्च घेण्यात येईल प्रत्येक सीडी अथवा फ्लॉपीसाठी ५० रुपये प्रति सीडी अथवा फ्लॉपी दर घेणेत येईल.
🔰 राज्य जन माहिती अधिकारी शुल्क भरणे बाबत अर्जदारास कसे कळवेल ?
महोदय,
आपला अर्ज दिनांक ............... या तारखेची प्राप्त झालेला आहे आपल्या अर्जाच्या संदर्भात आपणास असे कळून येते की, आपण मागणी अर्जामध्ये मागवलेल्या माहितीची तपासणी केली असता आपणास माहिती पुरवण्याबाबत च्या फ्री संबंधात ............ ही रक्कम जमा करावयाची आहे.
आपणास ही नोटीस मिळालेल्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत सदर रक्कम रोख स्वरूपात, धनादेशाच्या स्वरूपात, मनीऑर्डर च्या स्वरूपात रक्कम भरण्यात यावी अन्यथा आपला अर्ज फेटाळण्यात येईल.
राज्य जन माहिती अधिकारी
Promoted Content :
🔴 राज्य जन माहिती अधिकारी याकडे अन्य शासकीय प्राधिकरणाची माहिती मागण्यास काय करावे?🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.
🔴 राज्य जन माहिती अधिकारी कोणती माहिती फेटाळू शकतात ?
🔴 राज्य जन माहिती अधिकारी त्रयस्थ पक्षाची माहिती देऊ शकतो का ?
🔴 माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा.
🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२। YouTube Video।
🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video।