वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान. solar panel

वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान.  solar panel

Solar Rooftop Yojana : आता मार्च महिन्यातच उन्हाळा वाढत चाललेला आहे त्यामुळे तुम्ही  उन्हाळ्यात वीजेचा अधिक वापर करतच असाल त्यामुळे तुमच्या घरातील मासिक वीज बिलाची (electricity bill) रक्कम जास्त येते ? आता तुम्ही रूफटॉप सोलर सिस्टीम बसवून वीज बिलाची (electricity bill) मोठी बचत करू शकता ती कशी तर रूफटॉप सोलर सिस्टीम ही योजना घराच्या छतावर बसवून. रूफटॉप सोलर सिस्टीम ही  योजना २०१६ सुरु झाली असून या योजनेचा लाभ घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था,निवासी कल्याणकारी संघटना, घेवू शकतात. त्यासाठी केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालय निवासी ग्राहकांना ४० टक्के सबसिडी देते म्हणजेच तुम्हाला सोलर बसवण्यासाठी १,२०,००० ₹ खर्च आला तर  तुम्हाला केंद्र सरकारकडून ४० टक्के सबसिडी मिळेल, त्यामुळे तुम्हाला ७२,००० ₹ खर्च येईल आणि तुम्हाला केंद्र सरकारकडून ४८,००० रुपये सबसिडी तुमच्या बचत खात्यात जमा होईल. तर गट गृहनिर्माण संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटनांना २० टक्के सबसिडी केंद्र सरकारकडून मिळेल तसेच उर्वरित वीज महावितरणकडून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी नेट मीटरिंग व्यवस्थेद्वारे खरेदी ही केली जाते त्यामुळे आता तुम्ही रूफटॉप सोलर सिस्टीम बसवून फायदा घेवू शकताच आणि घरातील वीज बिल ही कमी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला चालू वीज बिल, आधार कार्ड, रेशन कार्ड, बचत खाते, १५ वर्षाचा रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, घराचे प्रॉपर्टी कार्ड सदर प्रॉपर्टी कार्ड वरती सह-हिस्सेदारां असतील तर त्यांचे संमतीपत्र, अर्जदाराचे फोटो, मोबाईल क्रमांक ह्या सर्व गोष्टीची पुर्तता करावी लागणार आहे. तुम्हाला रूफटॉप सोलर सिस्टीम या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज Solarrooftop.gov.in या  सांकेतिकस्थळावर करता येईल तसेच त्यावरती झोननिहाय एजन्सीची याद्या तुम्हाला दिसून येतील.

    हे हि वाचा :                   

🔴 वादग्रस्त फेरफार रद्द कसा करावा./ How to cancel a controversial modification.

🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land  

🔴 जमीन खरेदी करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे 

🔴 गोष्ट माहिती अधिकाराची_Right To Information

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

🔴  सात-बारा_७/१२ वरती कोणत्या नोंदी असतात ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking  

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post