Header Add

वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

🔰 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?

कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्यानंतर जर त्यांचे मृत्युपत्र तयार नसेल तर हक्क व दायित्व मिळवण्यासाठी वारसांना वारस नोंदणी करावी लागते. सदर दाखला मिळवण्यासाठी आपणास दिवाणी न्यायालयात जावे लागेल पाच लाख रुपयापर्यंत रकमेची अथवा मालमत्तेची मागणी तुम्हाला करावयाची असल्यास आपण कनिष्ठ स्तरावरती दिवाणी न्यायालयात जाऊ शकता त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला जिल्हा दिवाणी न्यायालय यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागेल. सदर अर्ज दाखल झालेल्या न्यायाधीश जाहीर नोटीस प्रसिद्ध करतात यासाठी अंदाजे ३०-३५ दिवस लागतात. सदर नोटीस जाहीर झाल्यानंतर कोणाचीही तक्रार अथवा हरकत आली नसलेस न्यायाधी कायदेशीर वारस प्रमाणपत्र देतात.

सदर अर्जावर तक्रार अथवा हरकत असल्यास तुम्ही कनिष्ठ दिवाणी न्यायालयात अर्ज केला असलेस तो अर्ज  जिल्हा दिवाणी न्यायालय यांच्याकडे वर्ग होईल त्यानंतर न्यायाधीश दोन्ही बाजूने पारदर्शकपणे पडताळून योग्य न्याय देतील आणि योग्य वारसदारास ठेवून वारस प्रमाणपत्र देतील. कायदेशीर वारस प्रमाणपत्र हे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांशी सांगणारा नाते, ओळख पुरावा आहे. सदर दाखला मिळवण्यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नी,मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण, अथवा मृत व्यक्तीचे लग्न झाले नसेल तर पालक करू शकतात.

कायदेशीर वारस दाखल्याची कोर्ट फी अंतिम ऑर्डर झाल्यावर द्यावी लागते. मिळकतीच्या व्हॅल्युएशन आधारित सदर रक्कम भरावी लागते. महाराष्ट्रा पुरते बोलायचे झाल्यास जास्तीत-जास्त ७५ हजार इतकी कोर्ट फी भरावी लागते. कायदेशीर वारस दाखवण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट, हेअरशिप सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.


🔰 सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय ? (Succession Certificate)
एखादी व्यक्ती मरण पावल्यावर त्यांच्या वारसांना जंगम मिळकतीबाबत म्हणजेच बँक खाते, बँक लॉकर, मुदत ठेव, पीपीएफ खाते, शेअर्स अशा जंगम मिळकतीसाठी वारसांना जे सर्टिफिकेट गरजचे असते त्याला सक्सेशन सर्टिफिकेट असे म्हणतात. सक्सेशन सर्टिफिकेट चा उपयोग फक्त जंगम मिळकतीसाठीच होतो.

(The Indian Succession Act, 1925 Section 372) भारतीय उत्तराधिकारी कायदा, १९२५ कलम ३७२ अन्वये मृत व्यक्तीच्या वारसांना जिल्हा न्यायालयात अर्ज करता येतो. त्या अर्जामध्ये मृत व्यक्तीची मृत्यूची दिनांक, मृत्यूच्या वेळी राहत असलेला पत्ता, वारसांची नावे, वारसांचे पत्ते, मृत व्यक्तीचे मिळकतीचे वर्णन या गोष्टींची आवश्यकता असते.

🔰 हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजे काय ? (Heirship Certificate)
एखादी व्यक्ती मरण पावल्यावर त्यांच्या वारसांना स्थावर मिळकतसाठी म्हणजेच जमीन,घर,दुकान या स्थावर मिळकतीसाठी वारसांना जे सर्टिफिकेट गरजेचे असते त्याला हेअर सर्टिफिकेट असे म्हणतात.हेअर सर्टिफिकेट चा उपयोग फक्त स्थावर मिळकतसाठीच होतो.

(Bombay Regulation VIII of 1827) बॉम्बे रेग्युलेशन १८२७ चे VIII ह्या अधिनियमाच्या आणि दिवाणी प्रक्रिया संहिता (Civil Manual) मधील तरतुदी प्रमाणे हेअरशिप सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मृत व्यक्तीच्या वारसांना जिल्हा न्यायालयात अर्ज करावा लागतो. त्या अर्जामध्ये मृत व्यक्तीची मृत्यूची दिनांक, मृत्यूच्या वेळी राहत असलेला पत्ता, वारसांची नावे, वारसांचे पत्ते, मृत व्यक्तीचे मिळकतीचे वर्णन या गोष्टींची आवश्यकता असते.

  PROMOTED CONTENS :   

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 ग्रामपंचायत चे कार्य कसे चालते.  

🔴  ग्रामपंचायती कोण-कोणता कर जमा करू शकतात ?

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

0 Comments