असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.


"असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा."

🔰 माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी दोन प्रकारे अर्ज केला जातो.

१. ऑफलाइन पद्धतीने :   ही पद्धत आपल्या सर्वांना परिचित आहे. तरी सुद्धा आपणास माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळणे बाबत चा नमुना खाली देत आहोत.

✍️माहिती अधिकार नमुना अर्ज ✍️

👉 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना YouTube Video

👉 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना YouTube Video

२. ऑनलाइन पद्धतीने : ही पद्धत नवीन असल्यामुळे आपणासमोर ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबद्दल या लेखामध्ये आम्ही सविस्तर माहिती सांगितली आहे.आपण आपल्या मोबाईल वरुन ऑनलाइन पद्धतीने माहिती अधिकार कसा प्राधिकरणास सादर करावा याची सविस्तर माहिती पद्धतीने सांगण्यात आली आहे.

🔰 मोबाईल वरून ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज कसा दाखल कराल ? 🔰 

Online RTI Application on Mobile :- 

सर्वप्रथम मोबाईलच्या chrome Browser वर जावून http://rti.online.maharashtra.gov.in/असे Search करायचे आहे.त्यानंतर आपल्यासमोर ऑनलाईन माहिती अधिकार प्रणाली ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ओपन होईल.त्यानंतर Mobile ची Desktop site करून घ्यावी. आपणाला वेबसाईट इंग्रजी मध्ये माहिती सांगत असेल तर आपण त्याची भाषा बदलू शकता.मराठी भाषा करण्यासाठी उजव्या कोपर्‍यातील इंग्लिश या शब्दावर क्लिक करून मराठी भाषा निवडावी.त्यानंतर वेबसाईट वरती मराठीत सर्व दिसू लागेल.त्यानंतर अर्ज सादर करा या शब्दावर क्लिक करावे.त्यानंतर आपणासमोर नवीन पेज ओपन होईल त्यावर ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्याकरता मार्गदर्शक सूचना दिसतील त्या वाचून झाल्यावर मी उपरोक्त मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत.आणि समजून घेतल्या आहेत असे लिहिलेल्या रखान्यासमोर क्लिक करून सबमिट करा/दाखल करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपणास ज्या प्राधिकरणाला माहिती मागवायचे आहे तो पर्याय निवडून अर्जदाराचे नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, पत्ता, अर्ज दाखल करण्याचे कारण दिले नंतर हव्या असलेल्या माहितीचा तपशील देऊन माहिती अधिकार अर्ज विहित नमुन्यातील हवा त्यानंतर आपणास अर्ज सबमिट करून विहित शुल्क इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे संबंधी प्राधिकरणास आदा करावे.

पोर्टलच्या बाबत काही माहिती हवी असल्यास  संपर्क  :  १८००१२०८०४०

Mail Id :  rti.support@maharashtra.gov.in या मेल वरती संपर्क साधावा 








🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२। YouTube Video। 

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video। 




Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post