१ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

घरबसल्या कसे लिंक कराल आधारकार्ड ला  - पॅन कार्ड ?  आपले आधार-पॅन कार्ड लिंक आहे का ?
१ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही.

आता हि पॅन-आधार कार्ड ला लिंक करण्याची शेवटची मुदत तुम्ही चुकविल्यास तुमचा १० अंकी अद्वितीय अल्फान्यूमेरिक क्रमांक निष्क्रिय होणार त्यामुळे आयकर विवरण पत्र भरण्यासाठी किंवा पॅन कार्ड संबधित सेवांमध्ये प्रवेश करण्यास आपणांस प्रतिबंध लागू शकतो, तर मग आताच आपण आपले पॅन कार्ड आधार लिंक करून घेण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करा, आणि तुमचे पॅन कार्ड  १ एप्रिल २०२३ पासून पुढे सुरु ठेवा.        

🔰 आपले आधार-पॅन कार्ड लिंक आहे का ?
सर्वप्रथम गूगल chrome ला  https://www.incometax.gov.in/iec/foportal असे search करा त्यानंतर आपल्या समोर official Page open होईल त्यानंतर आपणास त्या सांकेतिक स्थळावर Link Aadhar Status हे बटन दिसेल त्यावर क्लिक करून आपला Pan Number & Aadhaar Number टाकून त्याखाली दिसणाऱ्या View Link Aadhar Status वरती क्लिक करावे नंतर  आपणासमोर नवीन Open पेज होईल या ठिकाणी आपणास आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक बद्दल माहिती मिळेल.
🔰 आधार-पॅन कार्ड लिंक कसं करायचं ?
सर्वप्रथम Chrome मध्ये https://www.incometax.gov.in/iec/foportal असे search करा त्यानंतर आपल्या समोर  हे official Page open होईल. त्यानंतर आपणास त्या सांकेतिक स्थळावर Link Aadhaar हे बटन आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करून आपला  Pan Number, Aadhaar Number, Name as Per Aadhaar, Mobile Number टाकावा. तुमच्या आधार कार्ड वरील फक्त जन्मतारीख असल्यास त्या समोरील पर्यायावर क्लिक करा ही माहिती भरून झालेवर Captcha Code व्यवस्थित भरून Link Aadhaar चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर आपले आधार-पॅन कार्ड लिंक होईल.

🔰 एसएमएसद्वारे आपले आधार - पॅन कार्ड ला लिंक कसे कराल ?
सर्वप्रथम UIFPAN (स्पेस) नंतर आपला बारा अंकी आधार क्रमांक टाकून (स्पेस) आपला दहाअंकी पॅन कार्ड नंबर टाकून ५६१६१ किंवा ५६७६७८ वरती एसएमएस करावा. त्यानंतर आपणास आधार पॅन कार्ड लिंक झाल्याचा संदेश प्राप्त होईल.

 Promoted Content : 

🔴 घर बसल्या Blogging शिकून लाखो रुपये कमवा

🔴 तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post