सात-बारा_७/१२ वरती कोणत्या नोंदी असतात ?

 

🔰गाव नमुना ७ मध्ये खालील नोंदी असतात. 

👉सदर नोंद ही अधिकार अभिलेख पत्रक नोंद वही असते.

१. गावाच्या नावासोबत LGD कोड,तालुका,जिल्हा,भूमपान क्रमांक व उपविभागाची नोंद असते.

LGD म्हणजे काय ? : 

L- LocalG- GovernmentD- Directory   

२. सातबारा रकान्यात उजव्या कोपऱ्यात भूधारणा पध्द्त तर डाव्या कोपऱ्यात शेतीचे स्थानिक नावाची नोंद असते.

३. लागवडी योग्य श्रेत्राची नोंद, पोट-खराब श्रेत्राची नोंद, एकूण श्रेत्राची नोंद असते.

४. सातबारा श्रेत्रांचे Unit (एकक) नोंद असते 

शेतीसाठी श्रेत्रासाठी - हे.आर.चौ.मी. आणि  

बिनशेती श्रेत्रासाठी - आर.चौ.मी.

५. बिनशेती सातबारा मध्ये पोट-खराब क्षेत्र,जुडी व विशेष आकारणी,कुळ व खंड हे रकाने विगळलेले असतात.

६. खातेदाराच्या नावासोबत खाते क्रमांकाची नोंद असते.

७. दोन खातेदराच्या नावामध्ये तुटक रेषा छापनेत आलेली असते.

८. हक्कतील खातेदाराचे कमी झालेले नाव याची नोंद कंस करुन त्यावर आडवी रेषा मारलेली तुमच्या लाक्षात येईल.

९. इतर हक्कात प्रलंबित फेरफारची नोंद,शेवटीच्या फेरफार क्रमांकाची नोंद व दिनांक याची नोंद केलेली असते .

१०. कुळाचे नाव व खंड याची नोंद केलेली असते.

११. सातबाराच्या शेवटी डाव्या बाजूस जुने फेरफार ची नोंद तर डाव्या बाजूस सीमा आणि भूमापन चिन्हे याची नोंद असते.

🔰गाव नमुना १२ मध्ये खालील नोंदी असतात

सदर नोंद ही पिकांची नोंद वही असते.

👉पीक पाहणीच्या नोंदी ह्या अगोदर गावकामगार तलाठी करत होते.आता शेतकरी मित्र सदरची नोंद E Peek Pahani Online Maharashtra या ऍप मध्ये करू शकतो.

👉ई-पीक नोंद कशी करतात ? :-

शेतकरी मित्रांनी शेतातील पिकांची नोंद महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी व्हर्जन-2.0.6 मोबाईल ॲप मध्ये करावी.

सदरची नोंद करत असताना  स्वतःच्या मोबाईल वरुन करणे गरजेचे आहे.सर्व प्रथम तुम्ही  प्ले स्टोअर वर ई-पीक पाहणी व्हर्जन-2.0.6 मोबाईल ॲप अथवा ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा व तुमच्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांची नोंद करा, ॲप मध्ये पिकांची नोंद केल्यापासून ४८ तासानंतर पीक पाहणी सातबारावर येते.

ई-पीक पाहणी व्हर्जन-2.0.6 मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/3cRpcZ7 आणि आपली पिक नोंद आजच करा.

१. गावाच्या नावासोबत LGD कोड,तालुका,जिल्हा,भूमपान क्रमांक व उपविभागाची नोंद असते.

LGD म्हणजे काय ? : 

L- LocalG- GovernmentD- Directory    

२. वर्षची नोंद 

३. हंगामाची नोंद

४. पिकाखालील श्रेत्राची तपशीलची नोंद

५. लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमिनीची नोंद

६. जलसिंचनाच्या साधनाची नोंद 

७. शेरा ची नोंद


अश्या प्रकारे सातबारा मध्ये नोंदी असतात आपणास माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच आपणास यासारखी कोणती माहिती  हवी आहे ते “comment” मध्ये नक्की कळवा धन्यवाद.



  हे हि वाचा  : -   

🔴 वादग्रस्त फेरफार रद्द कसा करावा./ How to cancel a controversial modification.

🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land 

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 ग्रामपंचायत चे कार्य कसे चालते.   

🔴 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post