Header Add

प्लॉट खरेदी करताना कोणती कागद पत्रे पहावीत. / Important documents required for property purchase.

प्लॉट खरेदी करताना कोणती कागद पत्रे पाहाल ? / Important documents required for property purchase
 

तुम्ही प्लॉट खरेदी करते वेळी तो प्लॉट गुंतवणुकीसाठी, घर बांधणेसाठी, की व्यवसाय करणेसाठी खरेदी करत आहात हे ठरविणे सर्वप्रथम महत्वाचे आहे. कारण त्यानुसार तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी कारणे सोपी जाईल. कारण तुम्ही खरेदी करत असलेल्या प्लॉटची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच जाते त्यामुळे त्या बद्दलची सर्व माहिती तुम्हास असणे गरजेचे आहे. प्लॉट खरेदी केले नंतर त्या बद्दल हेवे-दावे निर्माण होऊ नयेत तसेच व्यवहार झाले वर तुम्हाला पश्चाताप होऊ नये म्हणून तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

🔰प्लॉट खरेदी करताय मग ही कागदपत्रे नक्की तपासून घ्या.🔰
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी ७/१२ उतारा का पहावा ?
१.  ७/१२ उतारा वरुन तुम्हाला भोगावटदार वर्ग कोणता आहे हे तुम्हास समजून येईल.
२. ७/१२ उतारा वरुन तुम्ही खरेदी करत असलेला प्लॉट कोणाच्या मालकीचा आहे तसेच त्यामध्ये कुळाचे अधिकार  आहेत का नाहीत हे तुम्हास समजून येईल.
३. ७/१२ उतारा वरुन सदर प्लॉट हा बिनशेती प्लॉट आहे की नाही हे तुम्हास समजून येईल.
७/१२ उतारा वरून बिनशेती प्लॉट आहे की नाही हे कसे ओळखाल ?
बिनशेती प्लॉट असलेस आर.चौ.मी. हे एकक आहे तर, शेतीसाठी श्रेत्रासाठी - हे.आर.चौ.मी हे एकक आहे.
४. ७/१२ उतारा वरुन सदर प्लॉट वर बॅंक, पथसंस्था, विकास सोसायटी यांचा बोजा आहे का नाही.
ह्या सर्व बाबी तुम्हास  ७/१२ उतारा पाहून समजून येतील.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी ८ अ उतारा का पहावा ?
८ अ उताऱ्यास जमिनीचा खाते उतारा असे म्हणतात या उताऱ्यामध्ये तुम्हाला गाव, तालुका, खाते क्रमांक, नाव, गाव नमुना ६ मधील नोंद, भूमपान क्रमांक, उपविभाग क्रमांक, श्रेत्र, आकारणी, जमिनीवरील नुकसान, स्थानिक उपकर ह्या सर्व बाबी तुम्हास ८ अ उतारा पाहून समजून येतील.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी गाव नमुना नंबर २ ही नोंदवही का पाहवी ?
कारण ह्या नोंद वहीत गावातील सर्व बिनशेती आदेश नोंद केले जातात. त्यामुळे सदर नोंद वहीत तुम्ही घेत असेलेल्या गटाचा बिनशेती आदेश नोंद केला आहे का नाही ही बाब तुम्हास नमुना नंबर २ ह्या नोंदवही वरुन समजून येतील.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी गाव नमुना नंबर  ६ ड ही नोंदवही का पाहवी ?
ह्या नोंद वहीत सदर ७/१२ उताऱ्यामधील फेरफारच्या नोंदी असतात. ह्या नोंदीस हक्क संपादन नोंद वही असे ही म्हणतात कारण सदर गटाच्या क्षेत्राची नोंद कशी झाली आहे तसेच पोटहिस्से नोंद झाली आहे का ही  बाब तुम्हास नमुना नंबर ६ ड ह्या नोंदवही वरुन समजून येतील.
👉   खरेदी करतेवेळी सर्च रिपोर्ट का पाहवा ?
सदरप्लॉट  गटाचा ३० वर्षाचा सर्च रिपोर्ट वकिला मार्फत काढून घ्यावा त्यामुळे तुम्हास प्लॉट चा व्यवहार झालं आहे का? न्यायालयात सदर प्लॉट बद्दल काही दावे प्रलंबित आहेत का हे समजून येणेसाठी सर्च रिपोर्ट काढणे गरजेचे आहे. सर्च रिपोर्ट मध्ये काही त्रुटी जरी नसऱ्या तरी तुम्ही वकीला मार्फत सदर प्लॉट बाबत स्थानिक पेपर मधून नोटीस जाहीर करावी त्यामुळे जर कोणाचे सदर प्लॉट संदर्भात हेवे-दावे असतील तर ते तुमच्याशी अथवा तुमच्या वकीला सोबत सपंर्क करतील.
👉  प्लॉट खरेदी करतेवेळी बिनशेती आदेश का पाहवा ?
१. सदर गटाचा बिनशेती आदेश तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, की जिल्हाअधिकारी या तीन अधिकारी मधील  कोणत्या अधिकाऱ्याने सदर बिनशेती आदेश दिला आहे हे तुम्हाला समजून येईल.
२. सदर श्रेत्र वाणिज्य,रहिवाशी अशा कोणत्या विभागामध्ये समाविष्ट केले आहे हे तुम्हाला समजून येईल.
३. सदर बिनशेती आदेश देते वेळेस कोणत्या अटी व शर्ती वरती देणेत आलेला आहे. 
    ह्या सर्व बाबी तुम्हाला बिनशेती आदेशा पाहून  समजून येतील.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी झोन दाखला का पाहवा ?
सदर दाखल्यावरून तुम्हाला तुम्ही खरेदी करत असलेला प्लॉट हा कोणत्या विभागात येतो तसेच सदरचा गट हा बाधित आहे का नाही हे तुम्हाला झोन दाखला पाहून समजून येईल.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी मोजणी नकाशा का पाहवा ?
मोजणी पुर्ण झालेवर भूमिआभिलेख कार्यालयात दोन नकाशे तयार केले जातात त्यास ब आलेख व क आलेख असे म्हणतात. सदर नकाशा वरती तुम्ही मोजणीचे कारण बघायचे आहे समजुतीच्या टिपा पाहून तुम्ही सदरच्या नकाशाचे वचन करूनच नकाशा वरील हद्दी तसेच सदर जागेवरील हद्दी पाहूनच योग्य निर्णय घेणेचा आहे.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी लेआऊट प्लॅन का पाहवा ?
कारण तुम्ही खरेदी करत असलेला प्लॉट हा लेआऊट प्लॅन मध्ये दाखवल्या प्रमाणेच आहे का व त्याची लेआऊट प्लॅन वरील लांबी व रुंदी व प्रत्यक्ष प्लॉट वरील लांबी व रुंदी बरोबर आहे का ? हे तपासून घेणेचे आहे. 
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी कमी जास्त पत्रक(क.जा.प) का पहावे ?
तुम्ही खरेदी करत असलेल्या प्लॉट चा स्वतंत्र ७/१२ असलेस तुम्ही कमी जास्त पत्रक पाहून तुम्ही मुळ भूमपान क्रमांक, हिस्सा क्रमांक, जमिनीचा प्रकार, एकुण श्रेत्र, आकार हे हिस्सा प्रमाणे झाले आहेत का हे तुम्हाला कमी जास्त पत्रक (क.जा.प) समजून येईल.
👉   प्लॉट खरेदी करतेवेळी विक्री करणाऱ्या व्यक्ती चे आधार कार्ड का पहावे ?
त्यामुळे विक्री करणाऱ्या व्यक्ती चे नाव ७/१२ सदरी नोंद आहे का तसेच प्लॉट विक्री करणार व्यक्ती कुठे राहतो या बद्दल तुम्हास माहिती घेणेचे सोपे जाईल. वरील सांगणेत आलेली सर्व कागदपत्रे पाहूनच तुम्ही योग्य तो अंतिम निर्णय घेणेचा आहे. ही सर्व कागदपत्रे तुम्ही तपासून घेतलेस तुमची फसवणुक होणार नाही तसेच तुम्ही खरेदी करणारा प्लॉट हा कायदेशीर रित्या योग्य प्लॉट असेल.

         हे हि वाचा :                   

🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 ग्रामपंचायत चे कार्य कसे चालते.   

🔴 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

0 Comments