Header Add

जमिनीच्या फेरफार सबंधी विचारले जाणारे प्रश्न ? FAQs -Ferfar Related

जमिनीच्या फेरफार सबंधी विचारले जाणारे प्रश्न ? FAQs for Ferfar Related 

https://www.socialmediaaanibarachkahi.com/


नेहमी विचारले जाणारे फेरफार संर्दभाने प्रश्न :

फेरफार नोंद कधी करतात ?
 हक्कात बदल झालेवर गावकामगार तलाठी फेरफार नोंद करतात.

⚫ फेरफार कधी नोंद केला जातो ?
  वारस नोंद केलेवर,खरेदीपत्र झालेवर,बक्षिसपत्र झालेवर,गहानखत झालेवर फेरफार नोंद केली जाते.

⚫ फेरफार नोंद कोणत्या नोंद वहीत करतात?
 फेरफार नोंद गाव नमुना ६ मध्ये केली जाते.

⚫ वादग्रस्त फेरफाराची नोंद कुठे करतात ?

⚫ दंड किंवा विलंब शुल्काच्या  फेरफाराची नोंद कुठे करतात ?
 दंड किंवा विलंब शुल्काच्या फेरफाराची नोंद गाव नमुना ६-ब मध्ये केली जाते.

⚫ वारस फेरफाराची नोंद कुठे करतात ?
 वारस फेरफाराची नोंद गाव नमुना ६-क मध्ये केली जाते.

⚫ पोठहिसाच्या फेरफाराची नोंद कुठे करतात ?
 पोठहिसाच्या फेरफाराची नोंद गाव नमुना ६-ड मध्ये केली जाते.

⚫ फेरफार प्रमाणित करण्याचा अधिकार कोणाचा आहे ?
 फेरफार प्रमाणित करण्याचा अधिकार मंडळ अधिकारी यांना आहे.

⚫ फेरफार नोंद करताना गाव कामगार तलाठी यांनी काय करावे?
 वारस फेरफार असलेस सर्व वारसांची नावे लावली आहेत का या बद्दल स्थानिक चौकशी करणे.
सर्व हितसंबंधिताना नोटीस देणे.
 हितसंबंधिताना हरकतीसाठी योग्य कालावधी देणे.
 नोटीशीस हरकत असलेस त्याची नोंद गाव नमुना ६-अ मध्ये करुन योग्य निर्णयासाठी मंडळ अधिकारी यांचेकडे सादर करणे.
 नोटीसीचा फेरफार कालावधी संपलेवर फेरफार मंजूर कारणे.

⚫ फेरफार ऑनलाईन कुठे पाहायचा?
 bhulekh.mahabhumi.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट

⚫ फेरफारमधील नोंद रद्द करण्याचा निर्णय किंवा आदेश कोण देते ?
 उपविभागीय अधिकारी

⚫ फेरफारमधील नोंद किती दिवसात होते ?
 हितसंबंधीतानां नोटीस दिलेल्या दिवसापासून पंधरा दिवसा नंतर फेरफार नोंद होते.

⚫ ई-फेरफारमुळे काय फायदा होतो ?
 विनाविलंब फेरफारची नोंद होते.
 तुम्हाला फेरफार मोबाईल वरती ऑनलाइन पाहता येतो.
 तुमचा फेरफार प्रलंबित असलेस त्या संबधात तुम्हाला माहिती लगेच मिळते.

⚫ फेरफार मंजूर करणे किंवा नाकारण्याचा निर्णय किती दिवसाच्या आत घेणे आवश्यक आहे ?
 फेरफार मंजूर करणे किंवा नाकारण्याचा निर्णय ३० दिवसाच्या आता घेणे बंधनकारक आहे.

⚫ फेरफार नोंद कशी केली जाते ?
 गावकामगार तलाठी फेरफार ऑनलाइन नोंद करतात.
 गावकामगार तलाठी हितसंबंधीतानां नोटीस  काढतात.
 गावकामगार तलाठी हितसंबंधीतानां नोटीस लागू करतात.
 नोटीशीतील हरकतीचे १५ दिवस पुर्ण झाले वर गावकामगार तलाठी त्यावर शेरा देवून मंडळ अधिकारी यांचेकडे सादर करतात.
 मंडळ अधिकारी  तो फेरफार निर्गत करतात.

Post a Comment

0 Comments