राष्ट्रीय वयोश्री योजना | 'Rashtriya Vayoshri Yojana' |
🔰 राष्ट्रीय वयोश्री योजना काय आहे.
आर्थिक स्थिती दुर्बल असणाऱ्या दिव्यांग नागरिक अथवा वृद्ध नागरिक जो शारीरिक दृष्ट्या अपंग आहे. तसेच स्वतःसाठी उपयुक्त अशी उपकरणे खरेदी करण्यास असमर्थ आहे अश्या दिव्यांग नागरिक अथवा वृद्ध नागरिकास राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत केंद्र सरकार द्वारे १ एप्रिल २०१७ पासून सामाजिक कल्याण विभागामार्फत मोफत उपकरणांचे वाटप केली जाते.
लाभार्थ्यांची निवड आरोग्य शिबीर आयोजित करून त्यांची तपासणी करून गरजेनुसार राज्य सरकार यात सहभाग घेऊन उपकरण समूहानेच वाटप करते.
🔰 राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मिळणारी उपकरणे :
१. चष्मा (Spectacles)
२. श्रावण यंत्र (Hearing Aids)
३. कृत्रिम अवयव (Artificial organs)
४. चालण्याची काठी (Walking sticks)
५. हाथ आणि पायांच्या कोपऱ्यांना बांधायची पट्टी (Elbow crutches)
६. तीन पायाची सायकल (Tripods/Quadpods Wheelchair)
🔰 राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता :
१. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
२. जेष्ठ नागरिक अर्जदारचे वय ६० वर्ष पूर्ण केलेली असावे.
३. शारीरिक दृष्ट्या दिव्यांग नागरिकांना ४०% अपंगतत्वाचा दाखला असणे गरजेचे आहे.
🔰 राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
१. पासपोर्ट साईज फोटो.
२. आधार कार्ड.
३. रहिवाशी पुरावा.
४. दारिद्र्य रेशन कार्ड.
५. मोबाईल नंबर.
६. शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला.
७. जेष्ठ नागरिक कार्ड किंवा वयाचा दाखला.
🔰 राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात सर्व ठिकाणी शिबिरे कधी भरवली जातात त्याची तारीख आणि पत्ता याची माहिती सरकारच्या या अधिकृत www.alimco.in वर दिली जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
Email Id : customercare@alimco.in
संपर्क क्रमांक : 1800-180-5129
Promoted Content :