कुळ तपासण्याचे अधिकार कोणाला असतात?

                           कुळ तपासण्याचे अधिकार कोणाला असतात ?

कुळ कायदा म्हणजे काय?

🔴 कुळ म्हणजे काय ?

कायदेशीररित्या दुसर्‍याची जमीन असणाऱ्या व्यक्ती कुळ असे म्हणतात सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्व प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या व्यक्तीच्या नावे कायदेशीर रित्या सातबाराचा इतर हक्कात कूळ म्हणून नोंद ठेवली गेली. सन १९४८ ला कूळ कायदा अस्तित्वात आला.त्यामुळे कुळांना अधिक अधिकार मिळाले.

🔴 भोगवटादार म्हणजे काय?

जमीन करण्याचा अधिकार धारण करणारी किंवा धारण करीत असल्याचे म्हणणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे भोगवटादार होय.


🔴 जमीनधारण करणाऱ्या व्यक्तींचे वर्ग किती आहेत ?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २९ पोट कलम (१) अन्वेय भोगावटादारा चे पुढील तीन प्रकार पडतात.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २९ पोट कलम (२) अन्वेय भोगावटादार वर्ग - १,
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २९ पोट कलम (३) अन्वेय भोगावटादार वर्ग - २,
भोगावटादार वर्ग - 3 सरकारी पट्टेदार.   

🔴 भोगवटादार वर्ग एक म्हणजे काय ?

मूळ मालकीची किंवा वडिलोपार्जित असलेली जमीन म्हणजे जमिनीचा कब्जा पूर्वीपासून ज्या खातेदाराकडे असतो.तसेच जमीन विकण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित खातेदारास असतो.अशा खातेदारास भोगावटादार वर्ग एक असे म्हणतात.

🔴 भोगवटादार वर्ग दोन म्हणजे काय?

वतन जमीन,देवस्थान इनामी जमीन,गायरान, पुनर्वसनच्या जमीन तसेच शासनाने कसण्यासाठी ज्या जमिनी दिलेल्या आहेत परंतु खातेदारास जमीन विकण्याचा अधिकार नसेल अशा खातेदारास भोगावटादार वर्ग दोन असे म्हणतात. सदर जमीनीची नोंद गावकामगार तलाठी गाव नमुना नं. १ (क) मध्ये करत असतात .

🔴 भोगवटादार वर्ग तीन म्हणजे काय ?

शासकीय जमीन काही अटी व शर्तींवर भाडेपट्ट्याने धारण करणाऱ्या खातेदारास भोगावटादार वर्ग तीन असे म्हणतात. सदर च्या जमीनी काही वर्षांच्या मुदतीने भाडेत्वावर देनेत आलेल्या असतात.  

🔴 सरकारी जमीन म्हणजे काय 

काही सात-बारा वरती महाराष्ट्र शासन असा उल्लेख असणाऱ्या जमिनी ह्या सरकारी जमिनी असतात. त्याची नोंद गावकामगार तलाठी गावनमुना नं १ (ब) मध्ये करत असतात.


🔴 सरकारी पडित जमीन म्हणजे काय ?

जर भूमापन क्रमांकाचा कोणताही पोट-विभाग महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ५५ अन्वेय सोडून देणेत आलेला असेल त्यास सरकारी पडित जमीन असे म्हणतात.

🔴 जमीन सोडून देण्याची कार्यपद्धत कशी असते ?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ चे कलम ५५ अन्वेय शासन किंवा भोगावटादार यांचे खरेज कोणतीही व्यक्ती कायदेशीरीत्या जे हक्क, धारणाधिकार, भार किंवा समन्याय अस्तित्वात असतील यांना अधीन राहून भोगावटादार यांनी महसूल वर्ष १ ऑगस्ट पूर्वी किमान तीस दिवस तहसीलदार यांना लेखी नोटीस देवून जमीन सोडू शकतो. ती जमीन राज्य शासनाच्या नावे करुन देता येईल त्यानंतर पुढील महसूल वर्ष पासून तो भोगावटादार राहणार नाही.

🔴 कुळ तपासण्याचे अधिकार कोणाला असतात?

एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा होता हे ठरविण्याचे अधिकार कुळ कायदा कलम ७० (ब) प्रमाणे तहसीलदार यांना आहेत. 

फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत.

ही माहिती आपणास कशी वाटली तसेच आणि कोणत्या विषयासंदर्भात माहिती आपणास हवी आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर  शेअर विसरू नका .


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post