🔰गोष्ट माहिती अधिकाराची🔰
👉 तुम्ही माहिती अधिकारामध्ये कोणाकडे माहिती मागू शकता ?
१. बॅक
२. अनुदानित संस्था
३. विना-अनुदानित संस्था
४. ट्र्स्ट
५. सामाजिक संघटना
६. शासकिय कार्यालय
७. निम-शासकिय कार्यालय
५. न्यायालय
६. स्थानिक स्वराज्य संस्था
👉 माहिती अधिकारामध्ये तुम्ही कोणती माहिती मागवू शकता ?
१. कागदपत्रे
२. अहवाल
३. रोजवाह्या
४. अभिलेख
५. दस्तऐवज
६. परिपत्रके
७. अभिप्राय
८. देणेत आलेले आदेश
९. कंत्राटे
१०. नमुने
११. प्रतिमाने
१. ए-३ प्रती पुष्ठ २₹
२. नकाशे - प्रत्यक्ष खर्च किंवा ठरविणेत आलेली रक्कम
३. अभिलेख तपासणी पाहिला एक तास विनामूल्य तिथुन पुढील तासास प्रती ५₹
४. सदर माहिती तुम्ही पोस्टाने मागविली असलेस त्या टपालास येणारा खर्च आपणास द्यावा लागेल. 🔴 राज्य जन माहिती अधिकारी शुल्क भरणे बाबत अर्जदारास कसे कळवतात.
✒️ पहिले अपील कुठे व कधी व कसे करावे ?
राज्य जनमाहिती अधिकारी यांनी माहिती ३० दिवसात न दिलेस अथवा तुम्हाला दिलेल्या माहिती अपुरी दिलेस तुम्ही प्रथम अपिलिय अधिकारी यांचेकडे माहिती अधिकार अधिनियम,२००५ याच्या कलम १९(१) अन्वये प्रथम अपील करू शकता. अपील सदर करत असताना अपिलाच्या उजव्या कोपऱ्यात २० ₹ चा कोर्ट फ्री स्टॅप लावा लागतो.
✒️ प्रथम अपिलिय अधिकारी अपिल निकालात किती दिवसात काढतात ?
प्रथम अपिलिय अधिकारी ३० ते ४५ दिवसात आदेश देवून अपील निकालात काढतील किंवा सदर अपील फेटाळतील.
✒️ दुसरे अपील कुठे व कधी व कसे करावे ?
प्रथम अपिलिय अधिकारी ३० ते ४५ दिवसात आदेश तुम्हाला मान्य नसलेस अथवा आदेश न दिलेस तुम्ही ९० दिवसाचे आत तुम्ही माहिती अधिकार अधिनियम,२००५ याच्या कलम १९(३) अन्वये दुसरे अपील करू शकता.अपील सदर करत असताना अपिलाच्या उजव्या कोपऱ्यात २० ₹ चा कोर्ट फ्री स्टॅप लावा लागतो.
✒️ माहिती न दिलेस दंड किती होतो ?
माहिती मागणी अर्ज सदर केले पासून प्रत्येक दिवसास २५०₹ इतका दंड अथवा दंडची ठरवुन देणेत आलेली रक्कम सदरची रक्कम ही पंचवीस हजार पेक्षा जास्त दंड करता येणार नाही.
🔰ऑनलाइन माहिती अधिकार अर्ज केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या साठी कोणत्या सांकेतिक स्थळावर करावा ?
👉 केंद्र शासनाच्या अंर्तगत येणाऱ्या कार्यालयासाठी https://rtionline.gov.in/ या सांकेतिक स्थळावर अर्ज करावा.
👉 महाराष्ट्र शासनाच्या अंर्तगत येणाऱ्या कार्यालयासाठी https://rtionline.maharashtra.gov.in/ या सांकेतिक स्थळावर अर्ज करावा.
हे हि वाचा :
🔴 राज्य जन माहिती अधिकारी कोणती माहिती फेटाळू शकतात ?
🔴 माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा.
🔴 राज्य जन माहिती अधिकारी याकडे अन्य शासकीय प्राधिकरणाची माहिती मागण्यास काय करावे?
🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२ YouTube Video।
🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video।