ग्रामपंचायत चे कार्य कसे चालते.


🔰 ग्रामपंचायतीची कामे.

१. पंचायतीची कर व फी आकारणे -

२. इमारत व जमिनीवरील आकार घेणे .

३. जमिनीवर सुधारित कर घेणे.

४. जकात घेणे.

५. यात्रेकरूवरील कर घेणे.

६. जत्रा,उत्सव व करमणूक कर घेणे.

७. व्यवसाय किंवा नोकरी कर घेणे.

८. सामान्य आरोग्यरक्षण कर घेणे

९. पाणीपट्टी घेणे.

१०. इमारत व जमीन करवसुली करणे.

🔰सरपंचांना कोणते कर्तव्य व अधिकार असतात ?

१. गावातील कोणत्याही व्यक्तीस उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार

२. अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.

३. ग्रामसेवकांच्या ताब्यात असणाऱ्या नोंदवहयांची देखरेख करणे व वेळोवेळी तपासणे.

४. ग्रामपंचायत इकडे येणाऱ्या पैशाची जबाबदारी घेणे व त्याचे योग्य नियोजन करणे.

५. ग्रामसभेच्या तसेच मासिक सभेच्या बैठकी बोलवणे.

६. ग्रामपंचायत निधी जमा झालेल्या सर्व रकमेची कोषाध्यक्ष म्हणून काम पाहणे.

७. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांचेवर तसेच ग्रामपंचायततिच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

८. ग्रामपंचायतच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व मालमत्तेची आकारणी योग्य पद्धतीने होते का याच्याकडे लक्ष देणे.

९. ग्रामपंचायत मार्फत केल्या जाणाऱ्या सर्व कामांना प्रत्यक्ष जाऊन भेट देणे.

१०. केंद्र शासन व राज्य शासन यांनी ग्रामपंचायतीकडे सोपवलेल्या योजनेची उद्दिष्टे प्रमाणे अंमलबजावणी होते की नाही याच्याकडे लक्ष देणे.

Prakriti Panchkarma Wellness Center

🔰ग्रामपंचायत सदस्यांना कोणते कर्तव्य व अधिकार असतात ?

१. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या तारखेला सरपंच व उपसरपंच यांना मतदान करण्याचा अधिकार.

२. मासिक मीटिंगमध्ये ठराव मांडण्याचा तसेच अनुमोदक व सुचक होण्याचा अधिकार.

३. ग्रामपंचायत मधील महत्वाचे रजिस्टर तसेच तक्रार अर्ज विनंती अर्ज यांची पाहणी करण्याचा अधिकार.

४. सरपंच अथवा उपसरपंच काम व्यवस्थित करत नसतील तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार.

५. ग्रामपंचायत मधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या वर देखरेख ठेवण्याचा अधिकार.

🔰ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना कोणते कर्तव्य व अधिकार असतात ?

१. ग्रामपंचायत ने केलेल्या विकास कामाचा खर्च तपासणे सक्षम मंजुरी शिवाय मंजूर नकाशे व अंदाज यामध्ये काही बदल झाला आहे का हे तपासणे.

२. पंचायतीला मिळालेली सर्व अनुदाने ही ज्या त्या वर्षात देय झाली आहेत का याच्याकडे लक्ष ठेवणे.

३. सरपंच,उपसरपंच,सदस्य, विस्तार अधिकारी, तसेच सक्षम शासकीय अधिकारी यांना सर्व लेखे,लेखा पुस्तके,लेखापरीक्षण व निरीक्षणासाठी सर्व नोंदी उपलब्ध करून देणे.

४. ग्रामपंचायत तिला जमा झालेल्या खर्चाच्या बाबतचे अचूक वर्गीकरण करणे.

५. ग्रामसभेत मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाची खर्चात तरतूद करणे.

६. ग्रामपंचायतच्या उत्पन्न व खर्चावर देखरेख ठेवणे.

७. अप्रामाणिकपणा,चूक,नियमबाह्यता, बेकायदेशीपणा यातून होणाऱ्या हानीपासून ग्रामपंचायतीचे पासून संरक्षण करणे.

८. ग्रामपंचायत उत्पन्न साधनांमध्ये वाढ कशी होईल याच्याकडे लक्ष देणे.

९. ग्रामपंचायत च्या मालिकेची मालमत्ता संदर्भात अभिलेख ठेवून सदर मालकीची देखभाल व संरक्षण करणे.

१०. सूट,परतावे,करामध्ये सूट किंवा कपात यामधील तपशिलांची माहिती ठेवणे व आपल्या अभिप्रायसह माहिती ग्रामपंचायतीस सादर करणे.

११. मालमत्ता करा संदर्भातील कर विशेष आकारणी कर याची नोंद ग्रामपंचायत सदरी ठेवणे.

१२. ग्रामपंचायतच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मालमत्तांची नोंदी करून त्याच्यावर योग्य आकारणी करणे व त्याची संपूर्ण वसुली करणे.

१३. आर्थिक वर्षामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची पूर्व लेखापरीक्षा करणे.

  PROMOTED CONTENS :   

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card

🔴 तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post