तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

               

तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

दिनांक २८ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागा मार्फत राज्यातील जमिनींना अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देणे बाबतचा शासन निर्णय झाला होता. यामुळे जमिनीला एक नवीन अकरा अंकी नंबर मिळाला आहे. याला सातबाराचा आधार क्रमांक/ ULPIN असे म्हणतात. ग्रामीण भागात सुमारे २.६२ कोटी सातबारे कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर शहरी भागात सुमारे ६० लाख नगरभुमापन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामध्ये दुबार ULPIN तयार होणार नाही. केंद्र सरकारने आधीच देशातील १० राज्यांमध्ये ULPIN योजना सुरू करण्याची सोय केली आहे. संगणकृत अलगिरिगमनुसार ULPIN निर्माण झाले असून त्याची शानिशाची व्यवस्था करण्यात आली  आहे.

याचा अर्थ जमीन आता कोणाच्या नावाची आहे हे पाहण्यासाठी सातबाऱ्याची गरज नाही ULPIN क्रमांक दिला की सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणे समोर येणार आहे. भविष्यात जमिनीचे विभाजन झाले तर त्या जमिनीचा आधार क्रमांक ही वेगळा असेल यामुळे जमिनीचे व्यवहार करणे अतिशय सोपे होणार आहेत तसेच पारदर्शक ही होणार आहेत. 

🔰 ULPIN म्हणजे काय? 

Unique Land Parcel Identification Number याचा मराठीत अर्थ पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर असा होतो. या ७/१२ ला ULPIN Number in ७/१२ Maharashtra असे म्हणतात. त्या ७/१२ वरती ULPIN Number हा अकरा अंकी  ७/१२ च्या डाव्या कोपर्‍यामध्ये तुमच्या गावाच्या नावाखाली दर्शवला गेला आहे हा ULPIN Number तुमच्या सातबारा कोणता मिळाला आहे हे तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.

🔰 ULPIN चा फायदा काय?

१. शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा उपयोग होईल.

२. जमिनीची खरेदी विक्री व्यवहारांमध्ये यामुळे पारदर्शकता येईल.

३. जमिनीचे व्यवहार करणे अगदी सोपे होणार आहे.

४. तुमच्या जमिनीची सगळी माहिती आणि कागदपत्र एकाच ठिकाणी तुम्हास मिळणार आहेत.

 

 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post