फेरफारमध्ये हितसंबंधितांनी तक्रार केलेस | ferfar notice takrar

फेरफारमध्ये हितसंबंधितांनी तक्रार केलेस.



महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम १४९ अन्वेय वारस हक्काने, खरेदीने, गहानखताने, दानपत्राने हक्क संपादन केलेल्या व्यक्तीने हक्क संपादन केलेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत प्रतिवृत्तांची नोंद करण्यासाठी अथवा महाराष्ट्र जमीन महसूल अनियमन १९६६ च्या कलम १५४ अन्वेय किंवा कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याकडून मिळालेली हस्तांतरणाची अथवा संपादनाची नोंद करण्यासाठी गावकामगार तलाठी यांच्याकडे अर्ज सादर झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम १५० पोटकलम दोन अन्वेय गावकामगार तलाठी सदर अर्जाची नोंद फेरफार गाव नमुना नंबर ६ नोंदवहीत नोंद करतील व त्याची नोंद संपूर्ण प्रत चावडीत ठळक ठिकाणी लावून फेरफरांमधील हितसंबंधितांना नोटीसा देतील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम १५० पोटकलम एक अन्वेय फेरफार नोंदवहीतील कोणतीही नोंद संबंधात  हितसंबंधितांना गावकामगार तलाठी यांना लेखी तक्रार दिल्यास गावकामगार तलाठी सदर  हितसंबंधिताच्या तक्रारीस पोच देखील त्यानंतर सदर तक्रार अर्जाची नोंदगाव नमुना नंबर ६ (अ) विवादग्रस्त प्रकरणाच्या नोंदवहीत नोंद करतील सदरची तक्रार मंडळ अधिकारी यांच्याकडे सादर करतील मंडळ अधिकारी वादी व प्रतिवादी यांचे लेखी म्हणजे घेऊन सदर विवादग्रस्त प्रकरणावरती एक वर्षाच्या आत निकाल देतील सदर वादी व प्रतिवादी यांना मंडल अधिकारी यांचा निर्णय मान्य नसल्यास सदर निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम २४७ अन्वेय आर.टी.एस अपील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करतील उपविभागीय अधिकारी वादी प्रतिवादी यांना नोटीसा देऊन त्यांचे लेखी म्हणणे घेतील त्यानंतर निकाल देतील त्या निकाला विरुद्ध हितसंबंधीतास आज अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे दुसरे अपील करण्याचा अधिकार आहे.



विवादग्रस्त  प्रकरणांची नोंद कशी ठेवतात?

गावकामगार तलाठी विवादग्रस्त प्रकरणाची नोंद गाव नमुना नंबर ६ अ मध्ये खालील नोंदी ठेवतात स्तंभ एक मध्ये अनुक्रमांक,स्तंभ दोन मध्ये फेरफारांच्या नोंदवहीतील अनुक्रमांक किंवा अधिकार अभिलेखातील कच्ची प्रत स्तंभ तीन मध्ये भू-मापन क्रमांक व उपविभाग क्रमांक स्तंभ चार मध्ये हरकत मिळाल्याची तारीख स्तंभ पाच मध्ये विवाद करणाऱ्या पक्षकाराच्या नावासह विवादाचा तपशील स्तंभ सहा मध्ये अधिकाऱ्यांच्या निर्णय ह्या सर्व नोंदी ठेवतात.


हे हि वाचा :

🔴 बांधकाम परवाना कुठे काढावा | construction permission License

🔴 शेती जमीनीचे वाटणीपत्र कसे करावे ? shet jamin vatani patra

🔴 गोष्ट माहिती अधिकाराची_Right To Information


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post