अशी झाली वारणेच्या सरपंच भेळ ची सुरुवात.

Batu bhel talsande, Hatkanangale

वारणेची सरपंच भेळ 


🍛 फेमस बटू भेळ🍛

हातकणंगले (प्रतिनिधी) : तळसंदे ता. हातकणंगले मधील महेश शिवाजीराव कुंभार या तरुण मुलाने राज्यशास्त्र पदवी घेतले नंतर मनुग्राफ इंडिया मध्ये ऑफिस बॉय ची नोकरी करत असताना २००६ साली आर्थिक मंदी आली आणि त्यांना कामावरून कमी केले. परंतु त्यांनी जिद्द न हरता काहीतरी व्यवसाय करायचा या हेतूने भेळची संकल्पना सत्यात उतरवली. उच्चशिक्षित असून थोडीही लाज न बाळगता या छोट्या व्यवसायात उतरायचे निश्चित केले. ३ डिसेंबर २००६ रोजी सुरवात करतया व्यवसायातील काहीच माहिती नसताना फक्त जिद्दीच्या जोरावर या व्यवसायात ठाण मांडले. सुरवातीचे कष्ट करून ही ६ महिने ८० रुपये ते १३० रुपये इतका कमी व्यवसाय होत असताना या तरुणाने जिद्द सोडली नाही.

Batu bhel talsande, Hatkanangale

गुणवत्तेत बदल करत इतर भेळ प्रमाणेच साहित्य सामग्री होती नंतर ग्राहकांच्या जिभेला चटकदार, लज्जतदार आणि शेवटच्या घासापर्यंत खुसखुशीत राहावी यासाठी भेळच्या कच्च्या मालात अमुलाग्र बदल त्यांनी केले आणि यातूनच सरपंच भेळ उदयास आली. या सरपंच भेळ मध्ये शेंगदाणे, फरसाण, मक्का चिवडा, बारीक शेव, यांचे प्रमाण भडंग इतके ठेवले. व त्यानंतर त्यात ग्रानिश साठी काजू आणि बेदाणे देवून तसेच  काही सिक्रेट मसाले त्या भेळ मध्ये वापरत स्पेशल सरपंच भेळ सर्व ग्राहकांच्या चवीस उतरली.

त्याच बरोबर कांदा लसून भेळ, आले-लसून भेळ, फरसाण भेळ इत्यादी प्रकारच्या भेळ ग्राहकांच्या उपलब्ध केले आणि ते सर्वांच्या पसंतीस उतरले. भेळचा व्यवसाय करत असताना गरीब पासून ते श्रीमंत पर्यंत लोकांच्या संपर्कात आले आणि समाजकार्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत निवडणुकीत उतरून विजयी देखील झाले आज एक व्यावसायिक आणि सामजिक कार्यात ग्रामपंचायत सदस्य पदाची जबाबदारी निश्चितच हि सर्व ग्राहकांच्या आणि तमाम जनतेच्या पाठबळावर निसंकोचपणे पार पाडत आहे. आज भेळ चे नाव ऐकल तरी फेमस बटू भेळ हे नाव आवर्जून घेतल जात. आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरून  उत्तम प्रकारे सेवा देतोय यातच ते समाधान मानतात असे आमच्याशी बोलतांना त्यांनी सांगितले.

famous Batu bhel Talsande, Hatkanangale
*फ्रेंचायसीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावरती संपर्क साधावा*

 🍛 फेमस बटू भेळ 🍛
चावरे फाटा तळसंदे, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर.
संपर्क : +91 99224 44705
e-Mail : mktalsande@gmail.com






Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post