प्राणी आणि निसर्गाकडे जगा आणि जगू द्या या साध्या सरळ तत्वाचा अवलंब करावा : प्रा. साळोखे.

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

 वारणानगर , येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वक्त्या प्रा. संध्याराणी साळोखे यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत प्रा. एन.आर. कळंत्रे, प्रा. डी.ए. खोत.

वारणानगर / प्रतिनिधी : 
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त 'वाघ : जंगलाची श्रीमंती' या विषयावर व्याख्यान आणि माहितीपट अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. संध्याराणी साळोखे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. 
अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. प्रा.साळोखे म्हणाल्या की, वाघ  निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा घटक असून वाघांच्या बरोबरच निसर्गातील सर्वच प्राण्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या जवळपास पाचशेच्या घरात पोहोचली असून ही सकारात्मक बाब आहे असेही त्या म्हणाल्या.
प्र.प्राचार्यडॉ.चिकुर्डेकर म्हणाले की, इंग्रजी चित्रपटातून प्राण्यांचे विकृत आणि हिंसक चित्रण दाखवून पैसा कमावण्यासाठी समाजाची दिशाभूल केली जात आहे. भारतीय, विशेषता हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीने सकारात्मक भूमिका घेऊन हाथी मेरे साथी, तेरी मेहरबानिया, तर मराठीत भालू, चित्रपटांनी प्राण्यांच्या सकारात्मक भूमिका दाखवून मनुष्य जीवनात प्राण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे पटवून दिले आहे.
मनुष्य आणि प्राणी एकमेकांचे पूरक असून निसर्ग, पर्यावरण आणि प्राण्यांच्या वरती मनुष्याने वर्चस्व गाजवण्याची गरज नाही.  प्राणी आणि निसर्गाकडे जगा आणि जगू द्या या साध्या सरळ तत्वाचा अवलंब केल्यास मनुष्य जातीचे जीवन सुखकर होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरातील वाघबीळ, आणि "वारणेचा वाघ" यावर वाघ, विषय संबंधाने संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत ही त्यांनी  व्यक्त केले.

यावेळी वक्त्या प्रा. सौ. साळोखे यांनी वाघ आणि वाघाच्या जीवनावर कांहीं चित्रफिती सादर केल्या. स्वागत प्रास्ताविक प्रा.एन. आर. कळंत्रे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.दिपाली मोरे-पाटील यांनी केले. संयोजन सहाय्य डॉ. प्रीती शिंदे-पाटील, प्रा. सीमा नलवडे, प्रा.वर्षा रजपूत यांनी केले. तंत्रसाह्य डॉ संतोष जांभळे यांनी केले. आभार प्रा. डी. ए. खोत यांनी मांनले. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविले शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान.  



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post