वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.

वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.

वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न...

वारणानगर / प्रतिनिधी : 

आपल्या बुध्दी कौशल्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रामधून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज सुराज्य फौंडेशनचे संस्थापक, आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील (सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला...

सुराज्य फौंडेशन, वारणानगर आयोजित २००८ पासून अखंडपणे सुरू असलेला, २०२० व २०२१ ही दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे थांबलेला, यावर्षी यू.पी.एस.सी. परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून यश संपादन केलेले यशवंत पुढीलप्रमाणे शुभम कुंदा अशोक भैसारे (गोंदिया), अभिजित राजेंद्र पाटील (धुळे), अश्विन बाबुसिंग राठोड (अकोला), वैभव नितिन काजळे (पुणे), अभिजित बबन पठारे (अहमदनगर)...

वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.

स्वप्निल जगन्नाथ पवार (नाशिक), अजिंक्य बाबुराव माने (सांगली), ओंकार राजेंद्र शिंदे (सातारा), रोशन प्रदिप देशमुख (ठाणे), देवराज मनिष पाटील (धुळे), नितिश दिलीपकुमार डोमले (गोंदिया), आशिष अशोक पाटील (शाहूवाडी), मानसी नरेंद्र सोनवणे (औरंगाबाद), राकेश महादेव अकोलकर (अहमदनगर), शुभम पांडुरंग जाधव (सोलापूर) याचां गौरव सोहळा आज उत्साहात पार पडला...

भविष्यात चांगल्या प्रकारे प्रशासकीय सेवेत काम करून एक आदर्श घडविण्याच्या दृष्टीने काम करावे आणि सर्व मान्यवरांची संपूर्ण कार्यकिर्द या देशाच्याप्रती यशस्वी करावी असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले...

वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.

यावेळी वारणा सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष व युवा नेते विश्वेश कोरे, वारणा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव पाटील, वारणा सहकारी दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव, गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने...

वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर.भगत, वारणा सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, वारणा बॅकेचे व्हा.चेअरमन उत्तम पाटील, वारणा बझारचे जनरल मॅनेजर व सुराज्य फौंडेशनचे संचालक शरद महाजन, सुराज्य फौंडेशनचे उपाध्यक्ष बी.बी.चौगुले, सुराज्य फौंडेशनचे संचालक बी.टी.पायमल, सुराज्य फौंडेशनचे संचालक विश्वासराव जाधव, सुराज्य फौंडेशनचे संचालक डॉ.बी.टी.साळोखे, सुराज्य फौंडेशनचे संचालक जीवनकुमार शिंदे व वारणा विविध उद्योग समुहातील सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्याथी - विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post