शेत जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात… Government rate of farmland


🔰 Government rate of farmland : शेत जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात… 🔰

Bullet Point :

👉शेत जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात ?।How to check government value of land
👉मोबाईल वरून गावातील शेत जमिनीचा सरकारी दर कसा बघायचा. How to see the government rate of  farmland in the village from mobile.
👉एक गुंठा,एक एकर,हेक्टर म्हणजे नेमके किती ? How much is one bunch, one acre, one hectare?
👉Government rate of farmland, ready reckoner rate 

तुम्ही तुमच्या गावातील शेत जमिन विकत घेत असाल तर त्या गावातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत ? याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे त्यावरून तुम्ही गावातील भौगोलिक परस्थिती व सदर शेत जमिनीचा दर्जा याचा अंदाज लावून सदर शेत जमिनीच्या दराचा अंदाज लावू शकता या लेखातुन तुम्ही तुमच्या गावातील शेत जमिनीचा सरकारी दर कसा काढायचा ते पाहू शकता.

🔰 मोबाईल वरून गावातील शेत जमिनीचा सरकारी दर कसा बघायचा…

१. तुम्हाला जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Chrome मध्ये जावून सर्चबार मध्ये igrmaharashtra.gov.in असं सर्च करायचं आहे.

२. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे सांकेतिक स्थळ ओपन होईल.

३. त्या पेज वर तुम्हाला डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसेल. यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

४. बाजारमूल्य दर पत्रक नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल.

५. तुम्हाला तुमचा जिल्ह्याच्या नावावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

६. त्या पेजवर तुम्हाला सगळ्यात आधी डावीकडे Year या रकान्यात तुम्हाला वर्षं निवडायचं आहे.

७. इथं उजवीकडे असलेल्या Language या रकान्यात जाऊन तुम्हाला सोईची भाषा निवडून झालेवर तुम्हाला इथं तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याचं नाव दिसेल.

८. आता तुम्हाला तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.

९. गावाचं नाव निवडलं की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसतील.

१०. तुम्हाला जे सांकेतिक स्थळावर जे भाव दिसत आहेत ते हेक्टर मध्ये आहेत.

🔰 जमीन कशी मोजातात ?
तुम्हाला जमिनीची लांबी व रुंदी माहिती हवी आहे त्यावरून तुम्हाला जमिनीचे क्षेत्रफळ समजते. सदरचे क्षेत्रफळ हे चौरस फूट मध्ये येते. त्याला १०८९ भागल्यास तुम्हाला किती गुंठे क्षेत्र आहे ते समजते त्यावरून तुम्ही किती एकर जमिन आहे ते ठरवू शकता.

 एक गुंठा,एक एकर,हेक्टर म्हणजे नेमके किती ?

 १ गुंठा म्हणजे किती चौरस फूट :  १ गुंठा म्हणजे १०८९ चौरस फूट 

  ३३ फूट x ३३ फूट - १०८९ चौरस फूट   

  १ एकर म्हणजे किती गुंठे          :   १ एकर म्हणजे ४० गुंठे 

  १ हेक्टर म्हणजे किती गुंठे         :   १ हेक्टर म्हणजे १०० गुंठे

  १ हेक्टर म्हणजे किती एकर       १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर

 १ चौ.मी. म्हणजे किती चौ. फुट  :  १ चौ.मी. म्हणजे १०.७६ चौ. फु

       हे हि वाचा :               

🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land

🔴 ‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडीक्षेत्रात कसे करावे ?

🔴 जमिनीच्या फेरफार सबंधी विचारले जाणारे प्रश्न ? FAQs -Ferfar Related

🔴 जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात ?

🔴 वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान. solar panel

🔴  "माहितीचा अधिकार अधिनियम २००५"

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post