अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

Engineering Diploma Admission Process


Polytechnic म्हणजे काय ? | What is Polytechnic? - डिप्लोमा

Engineering म्हणजे काय ? | What is Engineering - अभियांत्रिकी

📕 अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) म्हणजे काय ? | what is diploma in Engineering (polytechnic) ?

ही एक व्यवसाय अभ्यासक्रमाची पदविका आहे याला अभियांत्रिकी पदविका असे म्हणतात हा पुरस्कार करून आपण कनिष्ठ स्तर अभियंता होऊ शकतो पॉलिटेक मध्ये अनेक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम आहेत त्यातील प्रमुख आहेत.

१. Civil (स्थापत्य)

२. Mechanical (यांत्रिकी)

३. Electrical (विद्युत)

४. Chemical (रसायन)

     ह्या सर्व शाखेचा  अभ्यासक्रम MSBTE च्या अंतर्गत घेण्यात  येतो.  महाराष्ट्रात  ४०  शासकीय  अभियांत्रिकी  पदविका  महाविद्यालय आहेत .  

📕अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) नंतर करिअरच्या संधी | Career Opportunities after   Engineering Diploma (Polytechnic)

१. AMIE व्यवसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश.

२. पुढील शिक्षणासाठी  Engineering च्या द्वितीय वर्षात प्रवेश.

३. कनिष्ठ स्तर अभियंता म्हणून खाजगी किंवा शासकीय कार्यालयात नोकरीची संधी.

४. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी.

📕 अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) साठी प्रवेश पात्रता | Admission Criteria for Engineering Diploma (Polytechnic)

१. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी  -   प्रथम वर्षात प्रवेश.

२. आय.टी.आय (२ वर्षे)  उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी    -   थेट   द्वितीय वर्षात प्रवेश.

३. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी (विज्ञान किंवा व्यावसायिक शाखा) - थेट द्वितीय वर्षात प्रवेश.

४. वय वर्ष  कमीत कमी १४ वर्ष असावे.

📕अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) ला प्रवेश कसा घ्याल | How to get Admission In Engineering Diploma (Polytechnic)

१. सर्वप्रथम Chrome मध्ये http://www.dtemaharashtra.gov.in/index.html  असे टाईप करून सर्च करावे.

२.नंतर महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल.

३.आपणास   New   Registration   बटनावर क्लिक करून काळजीपूर्वक अर्ज ऑनलाइन   भरावयाचा  आहे. 

४.त्यानंतर फोटो कागदपत्रे अपलोड करून पेमेंट या बटनावर क्लिक करून पेमेंट करायचे आहे.

५.रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर आपण केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत आपल्या सोबत ठेवायचे आहे.

📕अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for polytechnic   

१.  तीन कलर फोटो.

२. शाळा/महाविद्यालय सोडलेल्या चा दाखला.

३. भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र.

४. जात प्रमाणपत्र.

५. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र.

 ६. आधार कार्ड.

७.   राष्ट्रीय बँकेच्या पासबुकाची छायाप्रत.

८. शैक्षणिक खंड पडला असल्यास त्याचे शंभर रुपये स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र.

९. पालकांचा उत्पन्नाचा दाखला.


🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post