यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविले शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि आमदार डॉ. विनय कोरे- सावकर यांच्याकडून अभिनंदन पत्र प्रदान करताना प्रभारी प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर.

वारणानगर / प्रतिनिधी :

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील कला शाखेतील पाच विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या यशाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ.वासंती रासम आणि प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये नियमित प्रवेश घेतलेल्या समीक्षा दळवी, मनस्वी लोहार, कल्याणी पाटील, स्वाती लोहार यांनी  बी.ए. प्रथम वर्षाच्या परीक्षेत सरासरी ८५ टक्के च्या वरती गुण प्राप्त केले आहेत. त्यांना प्रत्येकी रुपये दहा हजार आणि विद्यापीठाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तर अंजली गौड हिला एम. ए. च्या पहिल्या वर्षामध्ये सर्वोत्तम ग्रुप प्राप्त केल्याबद्दल १५ हजार रुपये शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. 🔴यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा....

या यशाबद्दल आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांनी विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन करून त्यांना अभिनंदनचे आणि सुयश चिंतनारे पत्र देऊन भविष्यात उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अत्यंत कठीण काळात सातत्यपूर्ण अभ्यास केला. गुरुजनांनी दिलेल्या प्रश्नोत्तर बँकेचा चांगला उपयोग झाला, यशात महाविद्यालयाचा, गुरुजनांचा मोठा वाटा आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की,अशा यशस्वी विद्यार्थिनींना विनय कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात यश मिळेपर्यंत मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. अतिश देशमुख यांनी आभार मानले.


 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post