आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

श्रीराम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) , नवे पारगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

📕 आय टी आय म्हणजे काय ?   What is ITI ?

Industrial Training Institute (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) 
       I - Industrial (औद्योगिक)    

T-Training (प्रशिक्षण)  

I - Institute (संस्था)

श्रीराम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.), नवे पारगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

श्रीराम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) , नवे पारगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर 

                                 Industrial Training Institute (द्योगिक प्रशिक्षण संस्था) -

- औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिल्पकारागीर घडवण्यासाठी काम करत असते विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच कुशल कामगार तयार करण्यासाठी ही संस्था कार्यरत असते.

- रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीईटी) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध रोजगार देणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली गेली.    

- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १३४ प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते विद्यार्थी आपल्या पसंतीनुसार व्यवसाय प्रशिक्षण घेऊ शकतो.

📕  आय. टी. आय. क्षेत्रात करिअर करण्यासाठी पात्रता | Career   Eligibility    in ITI

१. प्रशिक्षणार त्याचे वय १४ वर्षापेक्षा जास्त असावे.

२. व्यवसायाच्या प्रकारानुसार प्रवेश पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण अनुत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण असावा.

३. प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र धारक असावा.

४. प्रशिक्षणार्थीने यापूर्वी शासकीय अथवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही व्यवसायाचे प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेतलेला नसावा.

५. शारीरिक दृष्ट्या सक्षम असले बाबत नोंदणीकृत एम.बी.बी.एस डॉक्टर यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

६. उंची १६५ सेंटीमीटर,वजन ५२किलोग्रॅम छाती सामान्य ८१ सेंटीमीटर आणि फुगवून ८५ सेंटीमीटर उमेदवार सदर व्यवसायात प्रशिक्षण घेण्यास शारीरिक प्रशिक्षणार्थ्याकरीता लागू

७. प्रवेश फी भरण्यात आलेली पावती.

📕आय. टी. आय. करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे |  Required   Documents    for ITI   

१. प्रशिक्षणार्थ्याचे आधार नोंदणी कार्ड

२. प्रशिक्षणार्थ्याचे नाव समाविष्ट असलेले रेशन कार्ड

३. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile)

४. पालकांचा उत्पन्नाचा दाखला

५. जातीचा दाखला

६. जात वैधता प्रमाणपत्र फक्त अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांकरीता लागू

७. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक प्रमाणपत्र - फक्त खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी.

८. दिव्यांग प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांकरता वैद्यकीय मंडळाकडून दिलेल्या अपंगतत्वाचे प्रमाणपत्र जात अपंगतत्व कायमस्वरूपी असून त्याचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख असावा.

९. पुढील वर्षातील ३१ मार्च पर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिनल लेयर प्रमाणपत्र - विभक्त जाती आणि भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांकरिता.

📕आय. टी. आय.  प्रशिक्षणा दरम्यान मिळणाऱ्या सुविधा -

१. प्रशिक्षणार्थ्यास एसटी किंवा रेल्वे प्रवासात सवलत.

२. खेळ,करमणूक व वैद्यकीय मदत यांची विनामूल्य सोय.

३. ५०% प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येक दरमहा विद्यावेतन

४. अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना टूलकिट

५. आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा.

📕आय टी आय ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया | Admission Procedure for ITI

https://admission.dvet.gov.in/  अधिकृत वेबसाईटवर किंवा Google Paly Store मध्ये जाऊन Maha ITI App Download करून त्यामध्ये उमेदवाराने त्यांचा अर्ज करावा. त्यानंतर Merit List लागेल ती लिस्ट तुम्ही वेळोवेळी तपासू शकता आणि List ला नाव लागल्यानंतर प्रवेश निश्चित करू शकता.

📕आय.टी.आय नंतर चे करिअर |  Career Opportunities after ITI

१. शिकाऊ उमेदवार म्हणून  तुम्ही  नोकरी करू शकता.
२.  तुम्ही  तुमचा  स्वतःचा व्यवसाय सुरू करू   शकता.
३.  Polytechnic च्या    द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ   शकता.

🔴  अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

श्रीराम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.), नवे पारगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

श्रीराम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) , नवे पारगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर 


1 Comments

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

  1. अतिशय उत्तम शिक्षण देणारी ,आपल्या हक्काची आपली विश्वसनीय संस्था... श्री राम उद्योगिक प्रशिक्षण संस्था

    ReplyDelete
Previous Post Next Post