तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये अत्यल्प फी मध्ये प्रवेश.

वारणानगर/प्रतिनिधी :

येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये वारणा परिसर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांच्या संकल्पनेतून अत्यल्प फी मध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी येथे दिली.

गेली चार वर्ष वारणा परिसरात आर्किटेक्चर महाविद्यालय स्वतंत्र रूपाने कार्यरत असून नॅशनल अपट्युडेट टेस्ट इन आर्किटेक्चर - "नाटा", पात्रता परीक्षेसाठी २४ जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अर्ज करू शकतात शिवाय जेईई पेपर क्रमांक- ०२ दिलेले .

विद्यार्थी या पदवी कोर्स साठी पात्र आहेत. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये च्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांमध्ये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्याच्याही पेक्षा कमी फी मध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ४० विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या या आर्किटेक्चर पदवीसाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स विषयात सरासरी ३५ च्या वरती पात्रता "नाटा"ने निश्चित केली आहे. परंतु "नाटा", द्वारा आयोजित करण्यात आलेली पात्रता परीक्षा प्रवेशित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी २४ जुलै पर्यंत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑनलाइन नोंदणी  सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. nata.in या वेबसाईट वरतीही विद्यार्थी स्वतः फॉर्म भरू शकतात.

पाच वर्षांच्या या पदवी कोर्स साठी डिप्लोमा पात्र विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात. वारणा हे जगाच्या हित नकाशा वरती नाव असणारे शैक्षणिक क्षेत्र आहे. भव्य परिसर, सर्व सोयी सुविधांनी युक्त भव्य शिक्षण संकुल विज्ञान केंद्रासारख्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविले शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post