"वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव द्वारा आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्राचे वितरण करताना आमदार डॉ. विनय कोरे- सावकर. सोबत प्रा. डाॅ. सौ. वासंती रासम, प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर."
वारणानगर, प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना गांधी संस्कार परीक्षेत सुवर्ण पदक, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर यांच्या शुभहस्ते आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदकाचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव संस्थेकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांवर आयुष्याची वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्हास्तरावर तीन सुवर्ण पदके प्राप्त झाली आहेत. गांधी संस्कार परीक्षा ऑक्टोबर २०२१ मध्ये वारणानगर केंद्रावर संपन्न झाली होती.
जळगाव येथील महात्मा गांधी च्या विचारांचे अनुयायी पद्मश्री भवंरलाल जैन यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन, आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत महाविद्यालयातील इयत्ता 11 वी ते पदवी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी महात्मा गांधींच्या जीवन कार्यावर आधारित संदर्भ पुस्तकांचे वाचन करून परीक्षेत सहभाग नोंदविला. या आगळ्यावेगळ्या संस्कारशील उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे-सावकर व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
गांधी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक पद्मश्री भवंरलाल एच. जैन, चेअरमन डॉ. अनिल काकोडकर संचालक डॉ. डी. आर. मेहता व इतर सहकार्य यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व करुणा या मूल्यांचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या गांधी रिसर्च फाउंडेशनचे कार्य २००७ पासून भारतासह जगभरात पोहोचत आहे. देश विदेशातील सुमारे १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. राष्ट्रनिर्माता बापू, गांधी व्यक्तित्व, मोहन ते महात्मा, सत्याग्रही बापू, हिंद स्वराज्य, संक्षिप्त आत्मकथा, गांधीजींची चिरंतन तत्वे, समज-गैरसमज, बुनियादी शिक्षा इत्यादी इयत्ता निहाय पुस्तके महात्मा गांधी यांच्या मूल्यांवर आधारित विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कामध्ये दिली जातात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देवून त्यावर आधारित ३० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची ६० गुणांसाठी परीक्षा घेतली जाते. सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र तर गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते. परीक्षेचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेत नापास असा विद्यार्थ्यांना शेरा नाही. कमी अंक असले तरीही महात्मा गांधीजींच्या विचारांवर ती वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने संस्थेकडून नापास असा शेरा ठेवण्यात आलेला नाही. "महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा, शांती, करुणा या मानवी मूल्यांविषयीच्या विचारांची गरज ओळखून आपल्या प्रत्येकांचे सहजीवन या मूल्यांवर आधारित, संस्कारशील असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. वर्तमान काळात महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असे प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले.
महाविद्यालयामध्ये ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. गांधी विचार संस्कार परीक्षा या उपक्रमामध्ये परीक्षा आयोजनासाठी समन्वयक म्हणून डॉ. बी. के. वानोळे यांनी कार्य केले. त्याबरोबरच प्रा. के. जी. मदने, प्रा. आर. बी. बसनाईक, डॉ. आर.एस.पांडव, प्रा. एम.एन. पाटील, प्रा. एम.ए. सुतार, प्रा. जे.एस. शेटे, प्रा .डी. एस. पाटील, प्रा. पी.पी. अहिरे यांनी संयोजनात केले.
Promoted Content :
● बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे उज्वला गॅस वाटप, बांधकाम कामगारांना पेटी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या...
● आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...
● ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी : ॲड.शशिकला पाटील.
● सातवे पैकी शिंदेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...
● वारणेत जीपॅट गुणवंतांचा सत्कार..
● कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच...
● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.