वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या 34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील 34 विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. 
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या 34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील 34 विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची समवेत आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर,  प्राचार्य डॉ. एस.व्ही. आणेकर,  डॉ. पी.जे. पाटील.

वारणानगर (प्रतिनिधी) : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांना पुणे येथील बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये नोकरी ची संधी मिळाली आहे. करिअर कौन्सेलिंग, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आयोजित व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, टि. के. आय. ई. टी.,यांच्या सहकार्याने "स्टेट स्ट्रीट एच सी एल सर्विसेस", पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या "कॅम्पस ड्राईव्ह-२०२२" मध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील ३४ विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड झाली. या निवडीसाठी कंपनीचे अधिकारी  जयंत सरकार,  कार्तिकेय पानसरे, धीरज राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांची निवड ही पात्रता परीक्षा, ऑपरेशनल राउंड व एच. आर. इंटरव्यू अशा तीन प्रकारच्या परीक्षा देऊन झाली. या कॅम्पस ड्राइव्हसाठी २२५ विद्यार्थी हजर होते. पैकी ११९ विद्यार्थ्यांनी लेखी (पात्रता) परीक्षा दिली. त्यापैकी ८५ विद्यार्थी पात्रता परीक्षेत पात्र ठरले. तर पात्र विद्यार्थ्यांपैकी नोकरीसाठी ३४ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली. महाविद्यालयाच्या इतिहासात विशेषतः कला- वाणिज्य शाखेकडील इतक्या मोठ्या संख्येने निवड झालेली प्रथमच घटना आहे. निवड झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज येथे एका समारंभात श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे- सावकर यांच्या हस्ते आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांच्या प्रमुख उपस्थितीत नोकरी आदेश देण्यात आले.

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रो. पी. जे. पाटील,  प्रो. राजकुमार शिक्केरी, प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले. हा कॅम्पस ड्राईव्ह करिअर कौन्सेलिंग, ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. सत्यनारायण आर्डे, डॉ. भिमराव वानोळे, प्रा. दिनेश पाटील  यांनी यशस्वी केला.

Promoted   Content   :   

● जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली   आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)    यांची गाडी..

 कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच... 

 आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर...

● आपल्या व्यवसायाचे   product/services online selling कसे करावे.

● वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

   तळसंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महेश कुंभार यांची निवड.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post