ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन ग्राहक न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश ॲड.शशिकला पाटील यांनी केले.
H
कोल्हापूर, प्रतिनिधी : ग्राहकांची फसवणूक झाल्यास अथवा त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्यास ग्राहकांना वेळेत आणि योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे. ग्राहकांनीही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी ग्राहकांनी डोळस असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश ॲड.शशिकला पाटील यांनी केले. ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत ॲड. पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विश्वनाथ पोतदार होते.
ग्राहक संरक्षण कायदा मोठा आहे. याबाबत ग्राहकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे काम सर्वसामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच सुरू आहे. हे स्पष्ट करून ॲड पाटील पुढे म्हणाल्या ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक कोठेही पुराव्यासह तक्रार दाखल करू शकतो. जर तक्रारदार अनेक असतील तर कमिशनरची परवानगी आवश्यक असते. ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू खराब लागल्यास दोन वर्षाच्या आत करावी लागते. तसेच वस्तूची गॅरंटी वॉरंटी याबाबतची माहिती घ्यावी. ग्राहक न्यायालयात तक्रारदाराने आपली केस स्वतः दाखल करावी. हाच ग्राहक संरक्षण कायद्याचा उद्देश आहे. मात्र टेक्निकली प्रश्ना संबंधित तक्रार असेल तर वकील द्यावा लागतो.ग्राहकांना वेळेत आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे. यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशनने दक्ष रहावे. यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन ला मी नेहमीच सहकार्य करेन. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांची होणारी फसवणूक, याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल कशी करावी, आणि ग्राहकांना न्याय मिळेपर्यंत ग्रहक न्यायालया ची प्रक्रिया कशी चालते याबाबत ॲड पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
● जागतिक पर्यावरण दिन कोडोलीत वृक्षारोपण करून साजरा
ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्राहक कल्याण फाउंडेशन ताकतीने उभा राहिले असून सर्व कार्यकर्ते संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करत आहेत, ही कौतुकास्पद बाबा आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विषय पटलावरील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. बैठकीस ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाउपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे, दीपक बंडगर, कार्यवाह सर्जेराव खाडे, सचिव तानाजी पाटील, उमेश विभुते, सुषमा पाटील, अरुणा पोतदार, दिपाली पाटील, मारुती देवाळकर, बंडा मांगोरे, मानसिंग पाटील, यांच्यासह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, कार्यवाह सचिव उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्राहक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड. शशिकला पाटील, दिपाली पाटील, अरुण पोतदार, संयोगिता देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Promoted Content :
● सातवे पैकी शिंदेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...
● वारणेत जीपॅट गुणवंतांचा सत्कार..
● जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी..
● कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच...
● आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर...
● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.