बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे उज्वला गॅस वाटप, बांधकाम कामगारांना पेटी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या...

बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे उज्वला गॅस वाटप, बांधकाम कामगारांना पेटी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या

नागरिकांनी विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा :- आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...

बहिरेवाडी, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजनेसारख्या देशातील  गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठीही केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी केंद्राच्या जास्तीत जास्त योजनाचा लाभ घ्यावा,तसेच बहिरेवाडी ग्रामपंचायतीचे विषेश कौतुकही आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी केले...

ग्रामपंचायत बहिरेवाडी यांच्या विशेष प्रयत्नातून उज्ज्वला गॅस या योजनेच्या माध्यमातून १०० महिला लाभार्थीना शेगडी व गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. तसेच निमार्ण सामाजिक संस्था, कोडोली यांच्यातर्फे ५० बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप करण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.ग्रामपंचायत बहिरेवाडी यांच्या वतीने या कायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...

यावेळी वारणा दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव (आण्णा), बहिरेवाडी गावचे सरपंच शिरिषकुमार जाधव, उपसरपंच राजेंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य संपत कणसे, विजय कावळे, केदार-विजय गॅस एजन्सीचे मालक अरविंद जाधव, उत्तम जाधव, निमार्ण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील, प्रताप जाधव, अमर जाधव, गुणवंत बिरंबोळे आदि मान्यतर व लाभार्थी उपस्थित होते...


 Promoted  Content   :    

●   आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

●   ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी :  ॲड.शशिकला पाटील.

●   सातवे पैकी शिंदेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...

●   वारणेत  जीपॅट गुणवंतांचा सत्कार..

●   वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या   34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...

●     कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच... 

●   आपल्या व्यवसायाचे   product/services online selling    कसे करावे.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post