वारणेत जीपॅट गुणवंतांचा सत्कार...


जीपॅट परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मा. आ. डॉ. विनय कोरे, प्राचार्य डॉ जॉन डिसोझा, प्रा. किरण पाटील आणि प्रा. पोपट कुंभार.

वारणानगर (प्रतिनिधी) : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, वारणानगरच्या पाच विद्यार्थ्यांनी "जीपॅट" परीक्षेत यश मिळवले. फार्मसी शिक्षणातील पदवी नंतरच्या म्हणजेच एम. फार्मसी शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठीची परीक्षा म्हणजेच ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (जीपॅट); आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा घेतली जाते. 

सदरच्या परीक्षेत महाविद्यालयातील माधुरी दिवटे (१८४ गुण), दिपाली पाटील (१६३ गुण),  संदेश अर्जुनवाडकर (१५५ गुण), नम्रता डाफळे (१२४ गुण), आणि निवेदिता बोरवडेकर (९७ गुण) या विद्याथ्यांनी यश मिळवून या राष्ट्रीय परीक्षेत बाजी मारली. यशस्वी विद्यार्थांचे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. आ. डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांची मेहनत व त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढे येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील (ना.इ.प.र) परीक्षेसाठी प्रोत्साहित करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थांना महाविद्यालयातील प्रा. किरण पाटील, प्रा. विक्रम पोतदार, प्रा. पोपट कुंभार तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

  Promoted   Content   :   

●   जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली   आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)    यांची गाडी..

● वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या 34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...

●    कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच... 

   आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर...

●   आपल्या व्यवसायाचे   product/services online selling कसे करावे.

●   वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

 ●     तळसंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महेश कुंभार यांची निवड.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post