वारणानगर, प्रतिनिधी : वारणा कारखाना नर्सरीचे संपूर्ण कामकाज सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. शुभलक्ष्मी कोरे (वहिनीसाहेब) यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असून त्यांचे कल्पक दुरदृष्टीतून उद्योग समुहाच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकास व ऊस उत्पादन वाढीकरिता राबविण्यात येणाऱ्या नवनविन उपाययोजनांचा एक भाग म्हणून कारखाना नर्सरीमध्ये सुधारित ऊस रोपे तयार करण्यात आलेली असून या तयार करण्यात आलेल्या सुधारित ऊस रोपांच्या विक्रीचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचे शुभहस्ते करण्यात आला... ● कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच...
कारखान्याच्या गाळपासाठी लागणाऱ्या उसाच्या कमतरतेचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ऊस विकास कार्यक्रमावर भर दिला जात असून त्याचाच एक भाग म्हणून वारणा नर्सरी येथे विविध प्रकारच्या सुधारित ऊसाच्या जाती निर्माण करण्याचे काम सुरू असून ऊस रोपांच्या विक्रीबरोबरच उसाची लागण सुद्धा करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचे सांगत उसाबरोबरच फळे, फुले, भाजीपाला, वनौषधी यासारख्या रोपांची निर्मितीसुद्धा या नर्सरीच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी यावेळी सांगितले... ● जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी..
Promoted Content :
● ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी : ॲड.शशिकला पाटील
● सातवे पैकी शिंदेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...
● वारणेत जीपॅट गुणवंतांचा सत्कार..
● कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच...
● आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर...
● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.