यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील इयत्ता बारावी च्या निकालात मुलींची बाजी...

१२ वी च्या निकालात वारणा महाविद्यालयातून मुलींची बाजी...

YC Warana College 12th result 2022
 

वारणानगर , प्रतिनिधी : 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील इयत्ता १२ विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा ९४.३ टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा ९८.८. टक्के निकाल जाहीर झाला आहे. एकूण ९७६ पैकी ९६७ विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले आहे. सरासरी निकाल ९९.७ टक्के लागला आहे.  महाविद्यालयात प्रत्येक विभागातून प्रथम तीन आलेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मध्ये १० मुलींनी बाजी मारली आहे, तर ०२ मुलांनी स्थान पटकाविले आहे. एकूण निकालात टक्केवारी मध्ये ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणीचे अंक प्राप्त केले आहेत.

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे(सावकर),  प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. एस. एन. शेख यांनी यशस्वी  विद्यार्थ्यांचे आणि गुणवंतांचे अभिनंदन केले.

प्रत्येक विभागातून पहिले तीन आलेले विद्यार्थी अनुक्रमे असे - (कंसामध्ये क्रमांक) 

विज्ञान शाखा   : प्रतीक्षा केकरे(प्रथम), श्रेणी बुधले(द्वितीय), प्रणाली नलवडे(तृतीय).
कला शाखा     : पूजा माळी(प्रथम), विवेक संकपाळ(द्वितीय), स्वस्तिष्री बनसोडे(तृतीय)
वाणिज्य शाखा : पूजा कुंभार(प्रथम), तेजस्विनी पाटील(द्वितीय), श्रेयाल आवळे(तृतीय).
व्यवसाय अभ्यासक्रम विभाग : निदा महाबरी(प्रथम), सानिका मोहिते(द्वितीय), अमृता डोंबे(तृतीय).

महाविद्यालयामध्ये "विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंग, मेडिकल प्रवेशासाठी स्वतंत्र टॅलेंट बॅच सकाळी ०८ ते सायंकाळी ०६ पर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, नोट्स, व्याख्याने, सराव परीक्षा, घेतली जाणार असून वारणा पॅटर्न राबविण्यात यश मिळत आहे.",  असे मत प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी सांगितले आहे.

  Promoted  Content   :    

ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी :  ॲड.शशिकला पाटील.

●  सातवे पैकी शिंदेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...

● वारणेत  जीपॅट गुणवंतांचा सत्कार..

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या   34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...

●   कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच... 

● आपल्या व्यवसायाचे   product/services online selling    कसे करावे.


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post