आकांक्षा दिपक पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचा आयडियल अँकर पुरस्कार जाहीर...
आष्टा (प्रतिनिधी) : वाळवा तालुक्यातील बावची येथील आकांक्षा दिपक पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचा आयडियल अँकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आकांक्षा पाटील यांच्यावर बावची आणि पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आकांक्षा पाटील यांनी कमी वयात वक्तृत्व क्षेत्रात मोठे यश संपादित केले आहे. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी मोठा नावलौकिक कमाविला आहे. त्यांच्या वक्तृत्व कलेचं खासदार धैर्यशील माने, जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील, आमदार मानसिंगभाऊ नाईक, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव पाटील यांनी कौतुक केले आहे. विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ही त्यांनी केले आहे. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून त्यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.

याबाबत बोलताना आकांक्षा पाटील म्हणाल्या, मीडिया क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आपणाला हे यश मिळाले आहे. वक्तृत्व क्षेत्रात करिअर करण्याची मानस आहे.
Promoted Content :
● जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी..
● गरुड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे
● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.
● वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||