हातकणंगले, प्रतिनिधी : तळसंदे ता.हातकणंगले येथे नवजीवन दुध संस्थेच्या वतीने महिला शिबीर घेण्यात आले त्यावेळी कथाकथन कार्यक्रम आयोजनात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रुती विश्वेश कोरे, प्रा.अशोक पवार यांनी कथा सांगितल्या तसेच संस्थेच्या दुध उत्पादकांना चांदीची नाणी श्रुती विश्वेश कोरे यांच्या हस्ते देऊन बक्षीस वितरण संपन्न झाला. श्रुती विश्वेश कोरे यांनी वारणा उद्योग समुह आणि नवजीवन दुध संस्थेच्या कार्याची माहिती दिली.तसेच संस्थेच्या माध्यमातून सहली आयोजित करण्यात आलेल्या त्याबद्दल कौतुक केले. तसेच संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजना सांगितल्या. यावेळी वारणा दुध संघाचे संकलन अधिकारी अशोक पाटील यांनी दुध संघाच्या योजना व जनावरांच्या चारा व्यवस्थापना विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे स्वागत शोभा चव्हाण यांनी केली, प्रास्ताविक निता चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन बाबासो चव्हाण यांनी केले. उपस्थित मोहन चव्हाण, भिकाजी चव्हाण, नंदकुमार चव्हाण, अमोल कांबळे इतर संस्थेचे संचालक व असंख्य महिला उपस्थित होत्या.
Promoted Content :
● यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना गांधी विचार संस्कार परीक्षेत सुवर्णपदक...
● बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे उज्वला गॅस वाटप, बांधकाम कामगारांना पेटी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या...
● आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...
● ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी : ॲड.शशिकला पाटील.
● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.