जागतिक पर्यावरण दिन कोडोलीत वृक्षारोपण करून साजरा

दि. ०५ जून रोजी कोडोली येथील "Save Nature Community" या पर्यावरण प्रेमी संघटनेने विविध उपक्रम राबवून पर्यावरण दिन साजरा केला. 

Save Nature Community kodoli

कोडोली (प्रतिनिधी) :  दि. ०५ जून रोजी कोडोली येथील " सेव नेचर कम्यूनिटी" या पर्यावरण प्रेमी संघटनेने विविध उपक्रम राबवून पर्यावरण दिन साजरा केला. सेव नेचर कम्यूनिटी या पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण पूरक  झाडांचे वृक्षारोपण, पक्षांना घरटी, व विविध  फळ व फुलाच्या रोपांचे  संघटनेच्या वतीने कोडोली हौसिंग सोसायटी चे क्रिडांगणावर वृक्षारोपण केले. 

'वर्ल्ड इलेव्हन फुटबॉल क्लब चे खेळाडूंना विविध जातीची  रोपे वृक्षारोपणांसाठी  वाटप करण्यात आली यावेळी क्लब चे प्रशिक्षक  सागर केकरे  उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जेष्ठ नागरिक दिनकरराव जाधव, डॉ. नागनाथ डोईजड, अॅडव्होकेट राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख,  दिग्विजय राजेंद्र पाटील, आशिष कापरे, प्रवीण देशमुख यानी पर्यावरणाचे महत्व  सांगितले.

world eleven football club

सदर कार्यक्रमाचे नियोजन  शंतुनू काळगे, मल्हार माने, प्रणव गाताडे, अनिरुद्ध काइनगडे, श्रीमंत निकम, अनुज जाधव, हर्षवर्धन पाटील, समर्थ पाटील, यशराज डोईजड यांनी केले व  गिरीश गाताडे यांनी सर्व पर्यावरण प्रेमींचे आभार  मानले.

 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post