🔰ग्रामपंचायतीस कोणते कर व फी आकारण्याचा अधिकार आहे?

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२४ अन्वेय ग्रामपंचायतीस खालील प्रमाणे कर आकाराने बंधन करण आहे.

१.    इमारत व जमिनीवरील कर.

२.    जमिनीवरील सुधार आकार

३.    जकात

४.    यात्रेकरुवरील कर

५.    जत्रा, उत्सव व करमणूक कर.

६.    सायकल, बैलगाडी, घोडागाडी या वरील कर.

७.    धंदा किंवा नोकरी कर

८.    सामान्य आरोग्य रक्षण कर

९.    पाणीपट्टी

१०.  इतर कर

११. फी

१२. गुरांची नोंदणी फी इत्यादी कर व फी आकारण्याचा अधिकार आहे.

🔰ग्रामपंचायत कर व फी चे दर कसे ठरवते?

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मधील नियम ३ प्रमाणे निरनिराळ्या करांचे किमान व कमाल दर दिले आहेत, तसेच कर व फी आकारण्याची कार्यरित ही देणेत आली आहे. राज्य सरकारने प्रत्येक कारचे तसेच फी चे किमान व कमाल मर्यादा ठरवलेली असते.

🔰ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून घरपट्टी का घेते ?

१. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४ अन्वेय गाव जाहीर झाले नंतर गावातील जमीनीवरती कर बसवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस असतो.

२. गावामध्ये बांधणेत आलेली इमारतबिगर शेती जमीनीवर बांधणेत आलेली इमारतअथवा शेत जमीनवरती बांधणेत आलेल्या इमारतीवर कर घेणेचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे, त्यामुळे ग्रामपंचायत आपल्याकडून पडसर कर अथवा घरपट्टी कर घेत असते.

🔰ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून आरोग्य कर  का घेते ?

गावातील केर-कचरा काढणेसाठी, सार्वजनिक शौचालय साफ करणेसाठी, गावातील गटर साफ करणेसाठी ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून आरोग्य कर घेऊ शकते सामान्य आरोग्य रक्षण उपकर तसेच विशेष आरोग्य उपकर यांचे दर महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये देणेत आलेले आहेत.

🔰ग्रामपंचायत ग्रामस्थांच्याकडून पाणीपट्टी का घेते ?

ग्रामपंचायतीस सामान्य पाणीपट्टीचा कर बसवायचा असलेस ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाण्याची सोय करुन देणे गरजेचे आहे विशेष पाणीपट्टी कर बसवायचा असलेस ग्रामपंचायतीने त्या वेळी ग्रामस्थांच्या घरी पाण्याचे नळ बसवून विशेष पाणीपट्टी वसुली करावयाची आहे.सामान्य पाणीपट्टी कराचे नियम व दर महाराष्ट्र कर व फी १९६० भाग ९ मध्ये दिले प्रमाणे घेणेचे आहे तर विशेष पाणीपट्टी कारचे नियम व दर महाराष्ट्र कर व फी १९६० भाग १२ मध्ये दिले प्रमाणे घेणेचे आहेत

🔰ग्रामस्थ ग्रामपंचायत कर किंवा फी विरुद्ध कुठे व कधी अपील करू शकतात ?

ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या कर किंवा फी ची आकारणी , वसुली किंवा वसुली बसवणेसाठी तक्रार असलेस नियम ५२ नुसार बिल मिळालेपासून ३० दिवसाचे आत पंचायत समितीकडे प्रथम अपील करावे पंचायत समितीचा निकाल ग्रामस्थांना मान्य नसलेस ग्रामस्थ निकाल प्राप्त झालेपासून ३० दिवसाचे आत स्थायी समितीकडे द्वितीय अपील करू शकतात.स्थायी समितीने दिलेल्या निकाला विरुद्ध ग्रामस्थांना अपील करता येत नाही स्थायी समितीचा निकाल आखेरचा असतो,परंतु ग्रामस्थ राज्य सरकारकडे फेरतपासणी अर्ज करू शकतात. राज्य सरकारने दिलेल्या कर अगर फी तहकुबी आदेश जाहीर केलेवर ग्रामस्थांकडून तो कर अथवा फी वसूल करणेचा अधिकार ग्रामपंचायतीस नाही.


    हे हि वाचा :                   

➦ आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land  

➦ डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

 वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान.

  जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात  

 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?