येथे केंद्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्यदायी योजनेतील महाराष्ट्रातील पहिले जनऔषधी दुकानाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडले..

 



🔰 पोखले (ता.पन्हाळा) येथे केंद्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्यदायी योजनेतील महाराष्ट्रातील पहिले जनऔषधी दुकानाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन तर आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडले... 🔰

केंद्र शासनाच्या भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता.पन्हाळा या संस्थेसाठी मंजूर झालेल्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाले. त्यानंतर पोखले येथील या कार्यक्रमात जनऔषधी केंद्राचे उद्घाटन स्थानिक स्तरावर खासदार धैर्यशील माने,आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले...

तसेच पन्हाळा तालुक्यात दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धी चित्ररथाची फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या चित्ररथाद्वारे पन्हाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये संकल्प यात्रेबाबत प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.तसेच खासदार धैर्यशील माने,आमदार डॉ.विनय कोरे (सावकर),सहकार आयुक्त अनिल कवडे,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,विभागीय सहनिबंधक अरुण काकडे,जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे व सीईओ संतोष पाटील यांच्या हस्ते नागरिकांना मेडीकल किटचे वितरण करण्यात आले...


तसेच देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र योजना यावेळी सुरु केली. तसेच मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या १०,००० वरुन २५,००० पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाची घोषणाही केली. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेला आज १५ दिवस पूर्ण होत आहेत आणि आता यात्रेला वेगही आला आहे. ते पुढे म्हणाले, आरोग्य सेवा परवडणारी आणि सहज उपलब्ध करुन देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या संकल्पनेचा आधारस्तंभ आहे. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना हा या दिशेने सुरू असलेला एक प्रमुख उपक्रम आहे...

यावेळी शाहूवाडी - पन्हाळा विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे,पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे-जाधव,गटविकास अधिकारी सोनाली माडकर,सहाय्यक निबंधक नारायण परजणे,वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव,वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,वारणा कारखान्याचे संचालक रविंद्र जाधव (सरपंच),बहिरेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रमिला बाळासाहेब जाधव,पोखले गावचे सरपंच अशोक पाटील,माजी सरपंच डॉ.पांडुरंग निकम,बलभीम संस्थेचे चेअरमन धिरज नाईक,व्हा.चेअरमन संताजी निकम,संस्थेचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील,प्रल्हाद पाटील,दत्तात्रय पाटील,सचिव विलास गायकवाड,प्रा.राजेंद्र कोळेकर,ओंकार कोळेकर यांच्यासह वारणा समुहातील सर्व संचालक,पोखले गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post