गावकामगार तलाठी यांचे अधिकार व कर्तव्ये. / Gavkamgar talathi


महसूल प्रशासन अधिकारी कोण
सचिव(वन व महसूल विभाग)महाराष्ट्र शासन

विभागीय महसूल आयुक्त

उप आयुक्त (महसूल)

अप्पर महसूल आयुक्त

जिल्हाधिकार

अप्पर जिल्हाधिकारी

उप जिल्हाधिकारी 

उपविभागीय अधिकारी

तहसिलदार

अप्पर तहसिलदार

नायब तहसिलदार

मंडल अधिकारी

तलाठी

कोतवाल

👉 तलाठी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता?

      तलाठी होण्यासाठी उमेदवारास कोणत्याही शाखेचा पदवीधर असावे लागते.

👉 तलाठी यांची नियुक्ती कोण करते ?

      तलाठी यांची निवड स्पर्धा परीक्षा व्दारे होते व यांची नियुक्ती जिल्हाधिकार करतात.

👉 तलाठी महसूल खात्यातील वर्ग-३ चे कर्मचारी आहेत.

👉 तलाठी कार्यालयास काय म्हणतात ?

      तलाठी कार्यालयास चावडी असे म्हणतात.

👉 साझा म्हणजे काय ?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४ अन्वेय गावांचा गट म्हणजे साझा होय.३००० लोकवस्ती, १८०० हेक्टर जमीन व्यासक्षेत्र, ५०० खातेदार ८००० महसूल व ४ गावे मिळून साझा तयार होतो.

तलाठी ची नेमणूक कोण करतं.

🔰 तलाठी कामे :-

१. ऑगस्ट पूर्वी सर्व नोंद वाह्या पुष्ठांकन करुन त्यावरती तहसिलदार यांचेकडून स्वाक्षांकित करुन घेणे.

२. ऑगस्ट नंतर वार्षिक अहवाल संकलनासाठी तहसिलदार यांचे पाठवणे.

३. नवीन मोजणी केलेल्या हिस्श्याचे विवरणपत्र जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांना सादर करणे.

४. जमीन वापरातील बदलांचा अहवाल मंडल अधिकारी यांना सादर करणे.

५. निवडणूक मतदार यादी तयार करून तहसिलदार यांना सादर करणे.

६. वरिष्ठांनी दिलेल्या नोटीसा संबंधितांना बजावणे.

७. फेरफाराची नोंद अद्यावत ठेवणे.

८. फेरफार नोंद करणे आधि संबंधितांना नोटिसा देणे व त्याची एक प्रत चावडीत नोटीस बोर्ड वरती लावणे.

९. गाव नमुना ८ अ अद्यावत ठेवणे.

१०. कार्यभार अहवाल, रोकड नोंद वही अद्यावत ठेवणे.

११. शासनाने दिलेले आदेश प्रसिद्ध करणे.

१२. गावाची सीमा चिन्हे व भूमापन सुस्थितीत ठेवणे तसेच कुळवहिवाट सीमा, भुमापन चिन्हे,अतिक्रमण,पिके यांचे निरीक्षण करणे.

१३. फौजदारी तपासाचे जबाब घेणे.

१४. जमिनीचा महसूल व महसुलाची थकबाकी वसूल करुन संबधिताना शासना तर्फ वसुलीची पावती देवून जमा झालेला महसूल कोषागारात भरणे.

१५. खातेदारांना खातेपुस्तिका पुरविणे.

१६. अभिलेख उतारे देणे.

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ 🔴

🔰तलाठी गाव नमूना १ ते २१ मध्ये कोणत्या नोंदी ठेवतात ?

👉गाव नमुना १ ते ५ - जमीन महसूल व क्षेत्र नोंद वाह्या.

👉गाव नमुना ६ ते ८ अ - जमीन महसूल वसुली संर्दभात नोंद वाह्या.

👉गाव नमुना ८ ब ते १० अ - वसुली व ताळेबंद नोंद वाह्या.

👉गाव नमुना ११ ते १६ प्रशासनाच्या आकडेवारीशी नोंद वाह्या.             

👉गाव नमुना १७ ते २१ गाव संकीर्ण नोंद वाह्या.

🔰   तलाठी यांची तक्रार कुठे करावी                                        

तलाठी यांचेवर तुम्हाला तक्रार करावयाची असलेस तुम्ही त्यांची तक्रार मंडल अधिकारी ➡ तहसीलदार  उपविभागीय अधिकारी  जिल्हाधिकारी  विभागीय आयुक्त  सचिव (वन व महसूल विभाग) महाराष्ट्र शासन यांचेकडे क्रमाने करू शकता.


  हे हि वाचा :                   

➦ आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land  

➦ डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

➦ ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या कर व फी बदल कुठे तक्रार करू शकतात. / Gram Panchayat taxes and fees complaint

  जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात  

 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post