शेत जमीनीचे वाटणीपत्र कसे करावे ? shet jamin vatani patra


🔰जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याचे प्रकार कोणते आहेत?

१. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम ८५ अन्वेय.

२. दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या कलम ५४ अन्वेय.

३. दुय्यम निबंधक यांचे समोर दस्त नोंदवून.

१. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ अन्वेय जमिनीचे कायदेशीर वाटप कसे होते?

तुम्ही वकिला मार्फत वडिलोपार्जित मालमत्ता वाटपाचा विनंती अर्ज तहसीलदार यांच्याकडे सादर करत असताना क्षेत्राचे क्षेत्रफळ, अधिकार अभिलेखातील नोंदभूमापन क्रमांक, हिस्सा क्रमांकसत्ता प्रकार, जमिनीचा दुमला, भोगवटदाराचा वर्ग सधारकांची नावे, पत्ते, हिश्यांची व्याप्ती या सर्व बाबी विनंती अर्जात अचूक लिहिणेत याव्यात. सदर विनंती अर्जा सोबत सातबारा उतारा, ८अ उतारा, वारस फेरफार सोबत जोडावा सदरचा विनंती अर्ज सादर झाल्यावर तहसीलदार महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण अधिनियम १९४७ च्या कायद्यात बांधील राहून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ अन्वेय अर्जदार व सहधारक यांना नमुना अ नोटीस बजावतील सदर सदर नोटीसीमध्ये सुनावणीची तारीख असेल त्या तारखेस सहधारकांची काही हरकत असल्यास ते हरकत घेऊ शकतात तसेच नमुना व नोटीस तलाठी कार्यालयात लावणे चे आदेश देतील तसेच सदर गटांमध्ये बँका किंवा भू विकास बँक अथवा पत संस्थेचे कर्ज असल्यास त्यांना सदरची नोटीस बजावतील तसेच त्यांची काही हरकत असल्यास ते सदर सुनावणी हरकत घेऊ शकतात. सदर नमुना अ तसेच नमुना ब नोटीस कोणी हरकत न घेतले सदर गटाचे विभाजन करण्याचे आदेश तहसीलदार हे देतील.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ अन्वेय करण्यात आलेला अर्ज कोण फेटाळू शकते ?

अर्ज सादर झाल्यानंतर तहसीलदार नमुना व नमुना ब नोटीस दिल्यानंतर  सहधारक अथवा संबंधितांनी हरकत घेतले सदरचा विनंती अर्ज विवादग्रस्त म्हणून तहसीलदार निकाली काढतील सदर निकालाबाबत तुम्ही दिवाणी न्यायालयात दाद मागू शकता.

२. दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या कलम ५४ अन्वेय जमिनीचे कायदेशीर वाटप कसे करावे ?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ अन्वेय विभाजनासाठी तहसीलदार यांनी सुधारकास सुनावणीची वाजवी नोटीस दिल्यानंतर सुनावणीच्या दिवशी सहधारकाने हरकत घेतलेस अथवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ अन्वेय विभाजनासाठी सहधारकांची सहमती नसलेस तुम्ही हिस्सा संबंधी वाद असल्यामुळे वकिला मार्फत दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या कलम ५४ अन्वेय जमिनीचे कायद्याचे वाटप करण्यासाठी अपिल दाखल करून जमिनीचे कायद्याचे वाटप करू शकता.

३. दुय्यम निबंधक यांच्यासमोर दस्त नोंदवून जमिनीचे कायद्याशी वाटप कसे होते ?

स्व कष्टार्जित मिळकतीचे वाटप करते वेळी दुय्यम निबंधक यांच्यासमोर नोंदणीकृत वाटप अथवा बक्षीस पत्राने जमिनीचे कायदेशीर वाटप नोंदणी कायदा १९०८ चा कलम १७ अन्वेय स्व कष्टार्जित जमिनीचे कायदेशीर वाटप करता येते.

FAQS: -


१.    जमीनीची आणेवारी म्हणजे काय ?

सात बारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त जमीन मालक असलेस त्या प्रत्येक सह धारकाचा हिस्सा निश्चित करणे म्हणजे जमिनीची आणेवारी होय.

 

२.    आणेवारी कशी काढतात ?

दर्शवण्यात आलेली आणेवारी × जमीनीचे एकूण श्रेत्रफळ ÷ १९२ पैसे या सूत्राने आणेवारी काढली जाते. १९२ पैसे म्हणजे १६ आणे, १६ आणे म्हणजे १ रुपया, एक उलटा स्वल्पविराम म्हणजे आणे, दोन उलटे स्वल्पविराम म्हणजे पै.

 

३.   वडीलोपार्जित मिळकत म्हणजे काय?

पणजोबा अथवा आजोबा यांचे कडून जी मिळकत आपणास वारसाने प्राप्त होते त्या मिळकतीस  वडिलोपार्जित मिळकत असे म्हणतात.

 

 वडिलांकडून जी मिळकत आपणास वारसाने प्राप्त होते त्या मिळकतीस वडीलार्जित मिळकत असे म्हणतात.

५.    स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे काय?
जी मिळकत स्वकष्टार्जित रकमेतून घेणेत येते त्या मिळकतीस स्वकष्टार्जित मिळकत असे म्हणतात.

६.    सात-बारा उतारा  म्हणजे काय ?

अधिकार अभिलेख - गाव नमुना नंबर७, कुळवहिवाट-गाव नमुना नंबर ७ (अ), इतर व्यक्तीच्या काब्ज्यात  असलेल्या जमिनीची नोंद-गाव नमुना नंबर ७ (ब) व पिकांची नोंद -गाव नमुना नंबर १२ या  हक्क नोंदीस ७/१२ उतारा असे म्हणतात.


७.    आठ-अ उतारा म्हणजे काय ?

एका गावामध्ये खातेदाराच्या नावे एकूण किती जमीन आहे हे ज्या खाते उतार्‍यावरून समजते त्यास  आठ-अ उतारा असे म्हणतात.


    वारस हक्काने, खरेदीने, विभागणीने, दानप‍त्राने, गहाणखताने जमिनीच्या हक्कात जे बद्दल होतात त्यास फेरफार असे म्हणतात.

९.    वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कसे होते?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम ८५ अन्वे व दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८  च्या कलम ५४ अन्वेय.

१०. स्वकष्टार्जित मिळकतीचे वाटप कसे होते?

      दुय्यम निबंधक यांच्यासमोर दस्त नोंदवून.

   हे हि वाचा :            

➦ गावकामगार तलाठी यांचे अधिकार व कर्तव्ये. / Gavkamgar talathi

➦ डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

➦ ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या कर व फी बदल कुठे तक्रार करू शकतात. / Gram Panchayat taxes and fees complaint

  जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात  

 वारस दाखला का महत्त्वाचा आहे ?/ Why is heir registration important?

 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post